लिंबाच्या झाडाखाली थांबणे शेतकऱ्याला पडले अत्यंत महागात, बीड येथील दुर्देवी घटना.

बीडमध्ये अवकाळी पावसामुळे लिंबाच्या झाडावर वीज कोसळून शेतकरी देवीदास शहाजी केकाण यांचा मृत्यू झाला. त्यांची गायही दगावली. वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट सुरू असताना ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मराठवाड्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. भारतीय हवामान खात्याकडून अगोदरच गारपिटीचा इशारा हा देण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. पिकांचे मोठे नुकसान झाले. बीडमधून एक अतिशय दुर्देवी अशी घटना पुढे आलीये. अचानक पाऊस आला आणि शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर काळाने घाला घातला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जातंय.बीड जिल्ह्यात गुरुवारी दुपारी अवकाळी पाऊस पडला.

अंबाजोगाई, केज धारूर तालुक्यात काही प्रमाणात अवकाळी सरी पडल्या. केज तालुक्यातील केकाणवाडी येथे लिंबाच्या झाडावर अचानक वीज कोसळल्याने झाडाखाली थांबलेला शेतकरी ठार झाला. या दुर्घटनेत गाय मृत्युमुखी पडली. केज तालुक्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी अडीचच्या सुमारास पाऊस पडण्यास सुरुवात झाली. वादळी वारे आणि विजांचा कडकटात देखील सुरू होता.याचवेळी आडसपासून जवळ असलेल्या केकाणवाडी येथील शेतकरी देवीदास शहाजी केकाण (वय ७०) हे आसरडोह रस्त्याकडील शिवारात गाय घेऊन कोठ्याकडे निघाले असता अचानक पाऊस आल्याने ते लिंबाच्या झाडाखाली अडोसा म्हणून उभे राहिले आणि तिच चूक ठरली यावेळी या झाडावर वीज कोसळली आणि शेतकरी देवीदास केकाण यांचा जागीच मृत्यू झाला. देवीदास यांच्यासोबतच गाय देखील दगावली.

या घटनेची माहिती कळताच तलाठी सी. डी. कांबळे व आडस पोलिस चौकीचे पोलिस शिपाई सचिन सिद्धेश्वर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करीत शेतकऱ्याचा मृतदेह अंबाजोगाईच्या रुग्णालयात पाठवून दिला. आडस येथील पशू वैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना पाचारण करीत गायींची तपासणी करण्यात आली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. विज पाऊस यादरम्यान झाडाखाली उभे न राहण्याचा सल्ला दिला जातो. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.