
जालना जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी पत्नीवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला. पत्नीचा मित्र विनोद उबाळे यांच्या हॉटेलमध्ये काही पुरावे सापडले, ज्यानंतर आता मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही जप्त केले असून तपास सुरू आहे.उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी आपल्याच पत्नीवर गंभीर आरोप करत पोलिसात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला. हे प्रकरण ताजे असतानाच अजून एक धक्कादायक अशी माहिती या प्रकरणात पुढे आलीये. कटके यांच्या पत्नीचा प्रियकर विनोद उबाळेच्या जालना जिल्ह्यातील हॉटेलमध्ये काही पुरावे आढळले आहेत. ज्यात कपाळावर मोठे छिद्र असलेली कवटी अन् आठ वेगवेगळ्या आकाराची हाडे आढळली. तसेच एक बेसन पीठ असलेली पिशवीसह अघोरी जादूचे साहित्य आढळून आली आहे. आता मोठी खळबळ निर्माण झाली आहे.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके रा.
जालाननगर यांच्या फिर्यादीवरून ३० मार्च रोजी पत्नी सारिका कटके, पत्नीचा मित्र विनोद उबाळे, रा.जालना, सासू सुवर्णा देशमुख मेहुना आतिश देशमुख रा. सोनारी जिल्हा धाराशिव, छायाबाई गायकवाड, संगीता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, डॉक्टर रणजीत पाटील यांच्या पथकाने बुधवारी आरोपी विनोद उबाळे याचे गाव गाठले. त्यानंतर त्याच्या घर व हॉटेलची झडती घेतली. या झडतीमध्ये 17 इंच गोल आकाराची कवटी व 18 इंच उभी हाडाची कवटी आढळून आली.
हेच नाही तर 16 इंच आकाराचे हाडांचे ८ तुकडे आणि पीठ देखील तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले.या प्रकरणातील आरोपी विनोद उबाळे यांच्या वडिलांनी उपजिल्हाधिकारी कटके यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. हे साहित्य कटके यांनीच आणून ठेवल्याचेही त्यांनी नमूद तक्रार दाखल केली. याप्रकरणी सीसीटीव्ही तपासण्याची मागणी देखील विनोदच्या वडिलांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही देखील जप्त केले आहेत. मात्र, या घटनेनंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
Video Player
00:00
00:00