काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक, बिहारमध्ये सुरू होती पदयात्रा, ताब्यात घेण्याचं कारण काय?

कन्हैया कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे. बिहारमध्ये बेरोजगारी आणि स्थलांतराच्या विरोधात काँग्रेसचे नेते एनएसयुआयचे प्रभारी कन्हैया कुमार पदयात्रा करत होते.बिहारमध्ये बेरोजगारी आणि स्थलांतराच्या विरोधात काँग्रेसचे नेते एनएसयुआयचे प्रभारी कन्हैया कुमार पदयात्रा करत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. कन्हैया कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घालण्याची योजना आखली होती.ते मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार होते. ‘पलायन रोको-नौकरी दो’ या यात्रेच्या शेवटी कन्हैया कुमार यांनी हे नियोजन केले होते. पण पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतले. युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि युवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शिव प्रकाश गरीब दास यांना सुद्धा अटक झाली.

DSP कृष्ण मुरारी यांनी सांगितले की, “जे लोक आंदोलनाचे नेतृत्व करत होते, त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही लोकांना ताब्यात घेतले आहे. सगळ्यांना कोतवाली पोलीस स्टेशनला नेले जात आहे. या लोकांना आधी शांतपणे आंदोलन करण्याची सूचना दिली होती. पण जमाव खूप आक्रमक झाला, त्यामुळे पाण्याचे फवारे मारावे लागले. आम्ही 15 ते 20 लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यात कन्हैया कुमार पण आहेत.”कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मुख्यमंत्री यांच्या घराला घेराव घालण्यासाठी निघाले होते. पोलिसांनी कन्हैया कुमार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सगळ्यांना राजपूर पुलावरच थांबवले. पण कार्यकर्ते तिथेच थांबून घोषणा देत होते.यात्रेत राहुल गांधी झाले होते सहभागीकन्हैया कुमार यांच्या ‘पलायन रोको-नौकरी दो’ या यात्रेत काँग्रेसचे मोठे नेते सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी बेगुसरायला आले होते. तर सचिन पायलट सुद्धा पदयात्रेत सहभागी झाले. या पदयात्रेचा उद्देश बिहारमधील बेरोजगारी आणि लोकांचे शहरांकडे कामासाठी स्थलांतर करणे यावर लक्ष केंद्रित करणे हा होता. कन्हैया कुमार आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारला या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना खीळ बसली.आता या अटकेनंतर काँग्रेस कार्यकर्ते काय भूमिका घेतात आणि सरकार यावर काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

  • Related Posts

    महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय; महिला वकिल मारहाण प्रकरणी रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्री फडणविसांना संतप्त सवाल.

    अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला सनगाव येथील सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.मुख्यमंत्री महोदय हे फोटो…

    निवडणुकीत एकट्या कासलेला 10 लाख दिले, मग…; धनंजय मुंडेंच्या आमदारकीविरुद्ध न्यायालयात धाव.

    रणजीत कासले यांना धनंजय मुंडे यांनी ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी दहा लाख रुपये दिल्याच कासले यांनी म्हटले होतेराज्याच्या राजकारणात गेल्या 4 महिन्यांपासून बीड (Beed) जिल्हा केंद्रस्थानी आहे. अगोदर विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार धनजंय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय; महिला वकिल मारहाण प्रकरणी रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्री फडणविसांना संतप्त सवाल.

    महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय; महिला वकिल मारहाण प्रकरणी रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्री फडणविसांना संतप्त सवाल.

    निवडणुकीत एकट्या कासलेला 10 लाख दिले, मग…; धनंजय मुंडेंच्या आमदारकीविरुद्ध न्यायालयात धाव.

    निवडणुकीत एकट्या कासलेला 10 लाख दिले, मग…; धनंजय मुंडेंच्या आमदारकीविरुद्ध न्यायालयात धाव.

    अचानक गाय आडवी आली, ड्रायव्हरने ब्रेक मारताच कार थेट कालव्यात कोसळली, एअर होस्टेसचा करुण अंत.

    अचानक गाय आडवी आली, ड्रायव्हरने ब्रेक मारताच कार थेट कालव्यात कोसळली, एअर होस्टेसचा करुण अंत.

    पोटदुखीनं असह्य वेदना; डॉक्टरांना एक्स रेमध्ये सोन्याचं बिस्किट दिसलं अन् अजब घटनेचा उलगडा.

    पोटदुखीनं असह्य वेदना; डॉक्टरांना एक्स रेमध्ये सोन्याचं बिस्किट दिसलं अन् अजब घटनेचा उलगडा.