कोरटकरवर हल्ल्याची भीती, पोलिसांनी मीडियाच्या गाड्या रोखल्या; ‘त्या’ बातमीनं सगळ्यांनाच चकवा.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला आहे. आज त्याची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून सुटका झाली.कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला आहे. आज त्याची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून सुटका झाली. दोन दिवसांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकरला सशर्त जामीन दिला होता. पण शासकीय सुट्टीमुळे यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता काल होऊ शकली नाही. अखेर आज ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर कोरटकरची तुरुंगातून सुटका करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

कोरटकरवर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात दोनदा हल्ला झाला आहे. सुनावणीच्या सुमारास कोरटकरवर हल्ल्याचे प्रकार घडले. कोटककरनं केलेल्या विधानामुळे शिवशंभू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्याच्या विरोधात प्रचंड रोष आहे. याच कारणास्तव त्याची तुरुंगातून सुटका होत असताना पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. सुटकेनंतर कोरटकरला नेमकं कुठे सोडलं जातंय, याबद्दल पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती.कोरटकरला विमानानं बंगळुरुला पाठवण्यात येईल. त्यानंतर तिथून तो नागपुरला जाईल, अशी माहिती आधी पुढे आली होती. पण प्रत्यक्षात मात्र कोरटकर कोल्हापूरवरुन मुंबईच्या दिशेनं रवाना झाला. तो विमानानं मुंबईला येत आहे. मुंबईवरुन तो नागपुरला जाणार आहे. कोरटकर मूळचा नागपूरचा रहिवासी आहे. कोरटकरला बंगळुरुला पाठवण्यात येणार असल्याची ‘बातमी’ पेरुन पोलिसांनी सगळ्यांनाच चकवा दिला. प्रचंड गुप्तता पाळत पोलिसांनी कोरटकरला मुंबईच्या दिशेनं रवाना केलं.कळंबा कारागृहातून पोलीस कोरटकरला घेऊन बाहेर पडले. त्यावेळी तिथे मोठा पोलीस बंदोबस्त होता. पोलीस कोरटकरला घेऊन बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या गाड्या रोखण्यात आल्या. पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींची वाहनं थांबवल्यानं मोठा गोंधळ झाला. यावेळी माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये काहीशी बाचाबाची झाली. कोरटकरला विमानतळापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यात कोल्हापूर पोलीस यशस्वी ठरले. कोरटकर काही वेळात मुंबईत दाखल होईल. तिथून कनेक्टिंग फ्लाईटनं तो नागपुरला रवाना होणार आहे.

  • Related Posts

    महिला कलाकारांविषयी अश्लिल कमेंट, पोलिसांनी युट्यूबरच्या मुसक्या आवळल्या; लोकप्रिय अभिनेत्रीलाही दिलेला त्रास.

     केरळ पोलिसांनी अभिनेत्रींसंदर्भात आक्षेपार्ट टिप्पणी करणाऱ्या एका युट्यूबरला अटक केली आहे.दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या YouTuber ला अटक केल्याची घटना केरळमध्ये घडली. एर्नाकुलम पोलिसांनी अटक केलेल्या या युट्यूबरचे…

    पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

     पुण्यात कोंढवा परिसरात एका घरावर अज्ञात व्यक्तीने एअरगनने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. मनोज कानडे यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी तत्परतेने तपास करत बिलाल शेख…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महिला कलाकारांविषयी अश्लिल कमेंट, पोलिसांनी युट्यूबरच्या मुसक्या आवळल्या; लोकप्रिय अभिनेत्रीलाही दिलेला त्रास.

    महिला कलाकारांविषयी अश्लिल कमेंट, पोलिसांनी युट्यूबरच्या मुसक्या आवळल्या; लोकप्रिय अभिनेत्रीलाही दिलेला त्रास.

    पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

    पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

    पाकिस्तानने भारतीयांबाबत घेतला आता मोठा निर्णय, दिली ४८ तासांची मुदत, नाहीतर….

    पाकिस्तानने भारतीयांबाबत घेतला आता मोठा निर्णय, दिली ४८ तासांची मुदत, नाहीतर….

    अकोला हादरलं! सुशिक्षित कुुटुंबातील १४ वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं, सुसाईड नोट सापडली पण…

    अकोला हादरलं! सुशिक्षित कुुटुंबातील १४ वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं, सुसाईड नोट सापडली पण…