एक कार अनियंत्रित होऊन पुलाचा कठडा तोडून नदीत पडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला.भोपाळ: देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय देणारी घटना मध्य प्रदेशात घडली आहे. एक कार अनियंत्रित होऊन पुलाचा कठडा तोडून नदीत पडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला.मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये दुर्दैवी अपघात घडला. गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास अपघात झाला. अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचं पथक अपघातस्थळी पोहोतलं. कारमधील चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले.










