देवाला बकरा देण्यास निघाले, कारला भीषण अपघात; चौघे देवाघरी, पण बकऱ्यालाच देव पावला.

एक कार अनियंत्रित होऊन पुलाचा कठडा तोडून नदीत पडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला.भोपाळ: देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय देणारी घटना मध्य प्रदेशात घडली आहे. एक कार अनियंत्रित होऊन पुलाचा कठडा तोडून नदीत पडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला.मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये दुर्दैवी अपघात घडला. गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास अपघात झाला. अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचं पथक अपघातस्थळी पोहोतलं. कारमधील चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले.

त्यांना उपचारांसाठी जबलपूरमधील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची स्थिती गंभीर आहेत. मात्र ते शुद्धीवर आले आहेत.कारमधून प्रवास करणारे सहा जण त्यांच्यासोबत बकरा घेऊन जात होते. ‘प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार सहा जण देवाला बकऱ्याचा बळी देण्यासाठी निघाले होते. सहाजण एकाच समाजाचे आहेत. या अपघातातून बकरा वाचला आहे,’ अशी माहिती चरगवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक प्यासी यांनी दिली. अपघातातून वाचलेले दोघे अद्याप बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले नाहीत.अपघाताबद्दल अधिकची माहिती मिळवण्यासाठी पोलीस मृतांच्या शवविच्छेदन अहवालाची आणि वाचलेल्या दोघांच्या जबाबाची वाट पाहत आहेत. अपघातानंतर चरगवा पोलीस ठाण्याचं पथक लगेचच पोहोचलं. त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि मृतांना बाहेर काढलं. जखमींना तातडीनं जबलपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.अपघातात मृत पावलेले चौघे चौकीताल गावचे रहिवासी आहेत. किशन पटेल (३५), महेंद्र पटेल (३५), सागर पटेल (१७), राजेंद्र पटेल (३५) अशी मृतांची नावं आहेत. मनोज प्रताप (३५) आणि जितेंद्र पटेल लोधी (३६) या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. तेदेखील चौकीताल गावचे रहिवासी आहेत.

  • Related Posts

    ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अजित डोवाल सक्रिय, भारताच्या धडक कारवाईनंतर केले महत्वाचे काम.

    भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप लोकांच्या नरसंहाराचा बदला आज घेण्यात आला. या यशस्वी ऑपरेशननंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अनेक देशांतील समकक्ष…

    १२वीचा निकाल लागला, आनंदात प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला; नातेवाईकांकडून तरुणाचा खून.

    मुलीचा नातेवाईक योगेश यशवंत दूटे याच्याविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नवनाथ तुकाराम…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अजित डोवाल सक्रिय, भारताच्या धडक कारवाईनंतर केले महत्वाचे काम.

    ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अजित डोवाल सक्रिय, भारताच्या धडक कारवाईनंतर केले महत्वाचे काम.

    १२वीचा निकाल लागला, आनंदात प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला; नातेवाईकांकडून तरुणाचा खून.

    १२वीचा निकाल लागला, आनंदात प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला; नातेवाईकांकडून तरुणाचा खून.

    आणखी मोठं काहीतरी घडण्याचे संकेत, जवानांच्या सुट्ट्या रद्द, विमानतळांवरची उड्डाणे बंद.

    आणखी मोठं काहीतरी घडण्याचे संकेत, जवानांच्या सुट्ट्या रद्द, विमानतळांवरची उड्डाणे बंद.

    प्रेरणा फाऊंडेशन व सत्कर्म बालकाश्रम राष्ट्रगौरव पुरस्काराने गोसेवक प्राणीमित्र रोहित महाले सन्मानित.

    प्रेरणा फाऊंडेशन व सत्कर्म बालकाश्रम राष्ट्रगौरव पुरस्काराने गोसेवक प्राणीमित्र रोहित महाले सन्मानित.