
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे प्रबोधन सप्ताहाचा आजचा पाचवा दिवशीच्या कार्यक्रम म्हणजे दोन महामानवांचा जयंतीचा उत्सव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अशा या महामानवांच्या उत्सवानिमित्त आज संध्याकाळी 5 वाजता काव्यरत्नावली चौक ते फुले मार्केट महात्मा फुले यांचा पुतळा ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन इथपर्यंत महिलांची भव्य मोटरसायकल रॅली ठेवण्यात आली आहे तरी कृपया सर्व जाती धर्मीयांच्या महिलांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती.आपला नम्र आशिष सपकाळे अध्यक्ष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती जळगाव.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे प्रबोधन सप्ताहाचा आजचा पाचव्या दिवशीच्या कार्यक्रम म्हणजे दोन महामानवांच्या जयंतीचा उत्सव आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा या महामानवांच्या उत्सवानिमित्त आज संध्याकाळी पाच वाजता काव्यरत्न वरील चौक पासून आकाशवाणी चौक स्वातंत्र्य चौक पांडे चौक झाशीच्या राणीचा पुतळा फुले मार्केट महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्याअर्पण करून टावर चौकातून नेहरू चौक ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या ठिकाणी या महा रॅलीचा समारोप होणार आहे. त्या निमित्त महिलांचे नेतृत्व भारतीताई रंधे , नीलू ताई इंगळे तसेच दक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी सपकाळ यांच्या नेतृत्वात संपन्न झाली सोबत रंजनाताई पाटील यांनी जळगाव शहरातील 28 पिंक रिक्षा सुद्धा या महिलांच्या मोटरसायकल रॅलीत सहभाग करून घेतला. जवळपास 180 महिलांनी या मोटरसायकल रॅलीमध्ये भाग घेतला असून पिंक रिक्षा तसेच कार सुद्धा सहभाग झालेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयुष्यमान आशिष सपकाळे यांनी या रॅलीचं नेतृत्व केलं तसेच अध्यक्षस्थान आयुष्यमान सतीश मोरे सर आयुष्यमान राजेश जी झाल्टे माजी अध्यक्ष सतीश गायकवाड सचिव त्रुशाल सोनवणे खजिनदार सचिन सरकटे सर उपाध्यक्ष मोहन वडकमोल कार्याध्यक्ष चंद्रमणी मोरे सदस्य सपकाळे ध्रुव सपकाळे राजू डोंगरे हरिओम सूर्यवंशी निलेश परदेशी एडवोकेट अभिजीत रंधे तसेच समाजबांधव महिला व पुरुष या रॅलीमध्ये सहभागी झाले.