रेल्वेचे नागपूरला ९०३ कोटी! मुख्य स्थानकाला ५८९ तर अजनीला २९७; ‘या’ स्थानकांचाही होणार कायापालट.

 या प्रकल्पांतर्गत नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकाला ५८९ कोटी, अजनी रेल्वे स्थानकासाठी २९७कोटी आणि इतवारी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्थानकाला १७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वेस्थानकांचा समावेश करण्यात आला असून, त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकाला ५८९ कोटी, अजनी रेल्वे स्थानकासाठी २९७कोटी आणि इतवारी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्थानकाला १७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे वैष्णव म्हणाले.या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाच्या स्थानकांत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, भुसावळ, इत्यादींचा समावेश आहे. तसेच, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे. त्यात अक्कलकोट रोड, दौड इतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड इत्यादींचा समावेश आहे. या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाउंज, फूड कोट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्केलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्याकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.यांचा होणार कायापालट

■ अजनी स्थानक : २९७ कोटी ■ नागपूर मुख्य स्थानक : ५८९ कोटी■ नेताजी सुभाषचंद्र बोस, इतवारी : १७.४ कोटी
■ मूर्तिजापूर : १३ कोटी ■ बडनेरा : ३६.३ कोटी ■ भंडारा रोड : ७.७ कोटी ■ गोंदिया : ४० कोटी ■ तुमसर रोड : ११ कोटी■ शेगाव : २९ कोटी ■ बल्लारशा : ३१.४ कोटी ■ चंद्रपूर : २५.५ कोटी ■ चांदा फोर्ट : १९.३ कोटी ■सेवाग्राम स्टेशन : १८ कोटी ■ धामणगाव रेल्वे : १८ कोटी ■ हिंगणघाट : २२ कोटी ■ पुलगाव : १६ कोटी■ वाशीम : २० कोटी

  • Related Posts

    सात महिन्यांचं बाळ आईच्या हातातून निसटलं, २१व्या मजल्यावरुन खाली पडलं अन् क्षणात सारं संपलं; मन सुन्न करणारी घटना.

    विरारमध्ये एका सात महिन्यांच्या बाळाचा २१ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. हे बाळ आईच्या कडेवर असताना ते खिडकीतून थेट खाली पडल्याची माहिती आहे. सात महिन्यांचं बाळ ज्याने जेमतेम जग बघायला…

    मी घरात शिरलो, आईने टाहो फोडला, मलाही रडू आवरता आलं नाही, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरार.

    या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुश्ताक जीव वाचवून बाहेर पडला. सुरुवातीला फुगे फुटत आहेत का, असे वाटले. परंतु बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज वाढत गेले, असे त्याने सांगितले.‘अलीकडच्या काळात जम्मू आणि काश्मिर शांत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सात महिन्यांचं बाळ आईच्या हातातून निसटलं, २१व्या मजल्यावरुन खाली पडलं अन् क्षणात सारं संपलं; मन सुन्न करणारी घटना.

    सात महिन्यांचं बाळ आईच्या हातातून निसटलं, २१व्या मजल्यावरुन खाली पडलं अन् क्षणात सारं संपलं; मन सुन्न करणारी घटना.

    मी घरात शिरलो, आईने टाहो फोडला, मलाही रडू आवरता आलं नाही, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरार.

    मी घरात शिरलो, आईने टाहो फोडला, मलाही रडू आवरता आलं नाही, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरार.

    ‘जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणतोय’, नरेश म्हस्के यांचं वादग्रस्त वक्तव्य.

    ‘जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणतोय’, नरेश म्हस्के यांचं वादग्रस्त वक्तव्य.

    सिंधू नदीचं पाणी रोखणं म्हणजे युद्धाची घोषणा! भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानचे मोठे निर्णय.

    सिंधू नदीचं पाणी रोखणं म्हणजे युद्धाची घोषणा! भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानचे मोठे निर्णय.