पोटदुखीनं असह्य वेदना; डॉक्टरांना एक्स रेमध्ये सोन्याचं बिस्किट दिसलं अन् अजब घटनेचा उलगडा.

सध्या सोनं वाढत्या दरांमुळे चर्चेत असताना चीनमध्ये मात्र एका अजब घटनेमुळे सोनं चर्चेत आलं आहे. ११ वर्षीय मुलाच्या पोटात प्रचंड वेदना सुरु झाल्या. त्याच्या आई, वडिलांनी त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेलं.बीजिंग: सध्या सोनं वाढत्या दरांमुळे चर्चेत असताना चीनमध्ये मात्र एका अजब घटनेमुळे सोनं चर्चेत आलं आहे. ११ वर्षीय मुलाच्या पोटात प्रचंड वेदना सुरु झाल्या. त्याच्या आई, वडिलांनी त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेलं. त्याला वेदनाशामक औषधं देण्यात आली. पण तरीही पोटदुखी थांबली नाही. अखेर डॉक्टरांनी पोटाचा एक्स रे काढला. तेव्हा त्यांना आतमध्ये एक आयातकृती वस्तू दिसली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन ती वस्तू बाहेर काढली. ११ वर्षांच्या मुलानं सोन्याचं बिस्किट गिळलं होतं. त्यामुळे त्यांच्या पोटात यातना सुरु होत्या. सध्या ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे.

११ वर्षांच्या क्यूयननं खेळता खेळता १०० ग्रॅमचं सोन्याचं बिस्किट तोंडात टाकलं. पुढच्या काही क्षणांमध्ये त्यानं ते गिळलं. त्यानंतर त्याला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. जियांग्सू प्रांतातील सुझोऊमधील वैद्यकीय केंद्रात क्यूयनवर उपचार सुरु झाले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन क्यूयनच्या पोटातील सोन्याचं बिस्किट बाहेर काढलं. सोन्याचं बिस्किट गिळल्यानंतर क्यूयनचं पोट काही प्रमाणात सुजलं. बाकी त्याला कोणताही त्रास होत नव्हता.क्यूयनचे आई, वडील त्याला तातडीनं सुझोऊ विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लहान मुलांच्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्याची तपासणी करण्यात आली. क्यूयनच्या आतड्यांमध्ये जास्त घनतेच्या धातूची वस्तू असल्याचं एक्स रेमधून समजलं. सुरुवातीला डॉक्टरांनी क्यूयनची पोटदुखी कमी करण्यासाठी औषधं दिली. अतिसार व्हावा आणि पोटातील वस्तू नैसर्गिक विधी करताना बाहेर यावी यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले.यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा एक्स रे काढण्यात आला. धातूची ती वस्तू त्यात पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसली. त्या वस्तूमुळे आतड्यांना धोका असल्यानं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. एन्डोस्कोपीच्या माध्यमातून धातूची वस्तू बाहेर काढण्यात आली. त्यासाठी दोन डॉक्टरांनी अर्धा तास शस्त्रक्रिया केली.शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी क्यूयननं साधा आहार सुरु केला. तो आधीप्रमाणे जेवू लागला. यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. या घटनेची चिनी सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. यावर अनेकांनी काहीशा विनोदी प्रतिक्रिया दिल्या. ‘त्याला तो चॉकलेट बार वाटला का?’, असा सवाल एकानं विचारला. तर दुसऱ्या इंटरनेट वापरकर्त्यानं ‘त्यानं तो गोल्ड बार कसा गिळला? तो बऱ्यापैकी मोठा आणि कडक आहे. मला तर औषधाच्या गोळ्या गिळतानाही त्रास होता’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.