रणजीत कासले यांना धनंजय मुंडे यांनी ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी दहा लाख रुपये दिल्याच कासले यांनी म्हटले होतेराज्याच्या राजकारणात गेल्या 4 महिन्यांपासून बीड (Beed) जिल्हा केंद्रस्थानी आहे. अगोदर विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार धनजंय मुडेंच्या निकटवर्तीयांकडून झालेल्या गुंडगिरीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गंभीर आरोप केले होते. त्यानंतर, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यात तीव्र संतापाची लाट उसळल्यानंतर धनजंय मुडेंना मंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. आता, बीडमधील निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांनी धनंजय मुडेंवर (Dhananjay munde) गंभीर आरोप केले आहेत. तसेच, त्यांच्या माणसांकडून माझ्या बँक अकाऊंटवर 10 लाख रुपये टाकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावरुन, आता परळी मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विधानसभा उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले.










