
नांदेडमध्ये भीषण अपघात झाला असून मजूरांसह ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडला असून बचावकार्य सुरू आहे. हिंगोलीमधून महिलामजूरांना घेूऊन ट्रॅक्टर चालला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून विहिरीमध्ये सात ते आठ जण अडकल्याची भीती आहे.हिंगोली एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतामजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहीरीमध्ये पडल्याने भीषण अपघात घडला आहे. नांदेड शहरापासून दहा किलो मीटर दूर असलेल्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे. साठ फूट विहिरीत टॅक्टर कोसळला असून धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला आहे. ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे. ट्रॅक्टर मध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर होत्या. ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्ट विहिरीत कोसळले आहे. दगडू शिंदे नामक शेत मालका शेतात काम करण्यासाठी वसमत हून मजूर आणण्यात आले होते दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत दोन महिलांसह एका पुरुषाला वाचवले आहे. मात्र अद्याप ही सात ते आठ जण विहिरीत बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून हिंगोली सह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.दरम्यान, जखमी पुरुभाबाई कांबळे, पार्वती बुरड, सटवाजी जाधव यांना वाचवण्यात यश आले आहे.