६० फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर कोसळला, सात ते आठ मजूर बुडाले, नांदेडमध्ये हळहळ.

नांदेडमध्ये भीषण अपघात झाला असून मजूरांसह ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडला असून बचावकार्य सुरू आहे. हिंगोलीमधून महिलामजूरांना घेूऊन ट्रॅक्टर चालला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून विहिरीमध्ये सात ते आठ जण अडकल्याची भीती आहे.हिंगोली एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतामजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहीरीमध्ये पडल्याने भीषण अपघात घडला आहे. नांदेड शहरापासून दहा किलो मीटर दूर असलेल्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे. साठ फूट विहिरीत टॅक्टर कोसळला असून धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला आहे. ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे. ट्रॅक्टर मध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर होत्या. ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्ट विहिरीत कोसळले आहे. दगडू शिंदे नामक शेत मालका शेतात काम करण्यासाठी वसमत हून मजूर आणण्यात आले होते दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत दोन महिलांसह एका पुरुषाला वाचवले आहे. मात्र अद्याप ही सात ते आठ जण विहिरीत बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून हिंगोली सह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.दरम्यान, जखमी पुरुभाबाई कांबळे, पार्वती बुरड, सटवाजी जाधव यांना वाचवण्यात यश आले आहे.

ताराबाई जाधव, धरूपता जाधव, मीना राऊत, ज्योती सरोदे, चौथराबाई पारधे, सरस्पती भूरड, सिमरन कांबळे अशा एकूण सात महिलांचा मूत्यू झाला आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी ट्रॅक्टरचालकाने तिथून पळ काढला, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका व्यक्तीची पत्नीसुद्धा त्या ट्रॉयलीमध्ये बसलेली होती. नेमका अपघात कशामुळे झाला याबाबतचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. फरार झालेला ट्रॅक्टरचालक समोर येईल किंवा पोलीस त्याला पकडतील त्यानंतर अपघात होण्याआधी काय घडलं हे समजणार आहे.

  • Related Posts

    तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले, लग्नाला नकार; नाशिकच्या पोलीस अंमलदारावर आयुक्तांची मोठी कारवाई.

     नाशिक शहर पोलीस दलातील दंगल नियंत्रण पथकाच्या (आरसीपी) अंमलदाराने प्रेमसंबंध ठेवून विवाहाचे आमिष दाखवत विवाहित तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नाशिक शहर पोलीस दलातील दंगल नियंत्रण…

    माझ्यासाठी तो नेहमीच… विराटबद्दल इशांत शर्मा जे म्हणाला ते ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य.

    काल कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा सामना पावासमुळे रद्द झाला. आयपीएल पुन्हा सुरु झाल्यामुळे चाहत्यांमध्येही उत्साह भलताच दिसला. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने शनिवारी दिल्ली क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळापासून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले, लग्नाला नकार; नाशिकच्या पोलीस अंमलदारावर आयुक्तांची मोठी कारवाई.

    तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले, लग्नाला नकार; नाशिकच्या पोलीस अंमलदारावर आयुक्तांची मोठी कारवाई.

    माझ्यासाठी तो नेहमीच… विराटबद्दल इशांत शर्मा जे म्हणाला ते ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य.

    माझ्यासाठी तो नेहमीच… विराटबद्दल इशांत शर्मा जे म्हणाला ते ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य.

    पाकिस्तानचा भारताला काॅपी करण्याचा धंदा सुरुच; अन्यथा सिंधू नदीमधून रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोंना जबाबदारी!

    पाकिस्तानचा भारताला काॅपी करण्याचा धंदा सुरुच; अन्यथा सिंधू नदीमधून रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोंना जबाबदारी!

    सिंहगडावर गेल्यानंतर छातीत वेदना होऊन कोसळले; पुण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूने हळहळ.

    सिंहगडावर गेल्यानंतर छातीत वेदना होऊन कोसळले; पुण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूने हळहळ.