
औसा-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील बेलकुंड येथे एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. पावसामुळे वाहन चालकास अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे.राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यात तुळजापूर जिल्ह्याभरात देखील काल (3 एप्रिल)संध्याकाळपासून अवकाळी पावसानेचांगलाच जोर धरला होता. अशातच औसा-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील बेलकुंड येथे एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. पावसामुळे वाहन चालकास अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय, तर तीन लोक जखमी झाले आहेत.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भादा पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाई सुरू केली. तर जखमींवर औषध उपचार करण्यात आले. मात्र सारखा पाऊस सुरू असल्याने मदत कार्य पोहोचवताना अडचणींना सामोरे जावं लागलं. सतत सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे वाहन चालकांचा अंदाज चुकला आणि हा अपघात होऊन यात दोघांचा जीव गेला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, औसा – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड येथे रात्री नादुरुस्त असलेल्या ट्रकला मागून आयशर टेम्पो धडकला. त्याचवेळी आयशर टेम्पो मागून येणारी कार आयशर टेम्पोला धडकून भीषण अपघात झाला. या घटनेत आयशर टेम्पो चालक आणि नादुरूस्त ट्रक दुरूस्ती करणारा मेकानिकचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा -तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड जवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास (एमएच २६ -७२१२ ) क्रमांकाचा ट्रक नादुरूस्त अवस्थेत उभा होता. हा ट्रक दुरूस्त करण्याचे काम सुरू होते. ट्रॅक खाली एक मेकानिक साथीदारास मदत करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी औसा वरून पुणे येथे कोंथिबीर घेऊन निघालेल्या (एमएच २५ पी ३७३७) आयशर टेम्पोच्या चालकाला सुरू असलेल्या पावसामुळे नादुरुस्त अवस्थेत उभा असलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही.
भरधाव वेगातल्या आयशरने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकखाली काम करणाऱ्या व्यक्तीचाही यामुळे मृत्यू झाला. आयशरच्या पाठीमागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारणे अचानक झालेल्या घटनेमुळे वेळेवर ब्रेक न लागल्याने आयशरला पाठीमागून धडक दिली. कार मधील दोघांना किरकोळ मार लागला आहे. तर ट्रकच्या बाजूला असलेल्या व्यक्तीस ही मार लागला आहे. या घटनेत दोघांच जागीच मृत्यू आणि तीन जण जखमी झाले आहेत.घटनेची माहिती भादा पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर औषध उपचार करण्यात आले. सारखा पाऊस सुरू असल्याने मदत कार्य पोहोचवताना अडचणींना सामोरे जावं लागलं… अवकाळी पावसामुळे वाहन चालकांचा अंदाज चुकला आणि दोघांचा जीव गेला.
Video Player
00:00
00:00