सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडने मागितलेली कागदपत्रे दिली आहेत. कराडने कोर्टात अर्ज दाखल करत गुन्ह्यात सहभाग नसल्याचे म्हटले आहे. सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले की, मारहाणीचा व्हिडिओ कोर्टात सादर केला आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. अनेक गंभीर आरोप करण्यात आले. राज्यातील अनेक भागांमध्ये आक्रोश मोर्चे काढण्यात आली. देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक मारहाणीचे व्हिडीओ हे पुढे येताना दिसले आणि बीड जिल्हा चर्चेत आला.










