मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंट तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे. त्याला अमेरिकेतून विमानानं दिल्लीला आणण्यात आलं. आता त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे.मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंट तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे. त्याला अमेरिकेतून विमानानं दिल्लीला आणण्यात आलं. आता त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. तिथे त्याची चौकशी करण्यात येईल. तहव्वूर राणाला भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात देताना अमेरिकन सरकारनं घातलेल्या अटी महत्त्वाच्या आहेत.भारतात राणाच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात खटलेही सुरु आहेत. पण या सगळ्या गुन्ह्यांमध्ये राणाची चौकशी केली जाणार नाही. प्रत्यार्पण प्रक्रियेच्या वेळी भारतानं अमेरिकन कोर्टात ज्या खटल्यांचा उल्लेख केला आहे, ज्या खटल्यांची माहिती लिखित स्वरुपात दिली आहे, त्याच प्रकरणात खटला चालवण्यात येईल.भारत-अमेरिका यांच्यात १९९७ मध्ये प्रत्यार्पण समझोता झाला. त्यातील नियम, अटी, शर्तींनुसार राणाचं प्रत्यार्पण झालेलं आहे. हा समझोता दोन देशांमधील कायदेशीर सहकार्याचं प्रतीक आहे. ज्या व्यक्तीचं प्रत्यार्पण केलं जातंय, त्याच्या अधिकारांचा सन्मान झाला पाहिजे, असं प्रत्यार्पणाचे नियम सांगतात.










