‘मला किडनॅप करण्यात आलेलं, सतत मारायला सांगितलं होतं…’ भूषण कडून सांगितला धक्कादायक प्रसंग.

अभिनेता भूषण कडू याने अलीकडेच त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाविषयी सांगितले.अभिनेता भूषण कडू मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि विविध प्रहसनांमधून भूषणने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या नटाच्या आयुष्यात करोना काळात मात्र मोठे संकट कोसळले होते. यादरम्यान त्याच्या पत्नीचे निधन झाले आणि अभिनेता नैराश्याचा सामना करत होता. बराच काळ तो सिनेविश्वापासूनही दुरावाला. अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना त्याने आणखी एका कठीण प्रसंगाला तोंड देण्याविषयी भाष्य केले.

भूषणने एका मुलाखतीमध्ये बोलताना खुलासा केला की, पुण्यात त्याचे अपहरण झाले होते आणि त्याला तीन दिवस डांबून ठेवण्यात आले होते. हा धक्कादायक प्रसंग सांगताना कडू म्हणाला की, ‘जेव्हा चांगलं चाललेलं असतं तेव्हा, कुठेतरी काहीतरी आपल्या पाठीमागे वाईट घडत असतं. त्याची आपल्याला कुणकुण नसते. मला किडनॅप पण करण्यात आलं होतं. तीन दिवस पुण्यात किडनॅप करुन ठेवण्यात आलं होतं.’ अल्ट्रा झकासला दिलेल्या मुलाखतीमध्ये भूषण बोलत होता.त्या भयंकर आठवणीबद्दल सांगताना तो पुढे म्हणाला की, ‘ज्या माणसाने सुपारी दिली होती त्याने एकाला सांगितलं होतं की याला मध्ये मध्ये मारत राहा, पण त्याने मला नाही मारलं. तो हाताने आवाज काढायचा आणि समोरच्याला सांगायचा की मी त्याला मारतोय. कारण तो माणूस मला भूषण कडू म्हणून ओळखत होता. तो म्हणाला की, सर मी तुम्हाला मारु शकत नाही. तुम्ही कलाकार आहात. मी तुमचं काम बघतो. माझी मुलंही तुमची कामं बघतात.’भूषणबद्दल सांगायचं झाल्यास, ‘घडलंय बिघडलंय’ने त्याला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय त्याने सात वर्षे ‘कॉमेडी एक्सप्रेस’ हा शो केला. अभिनेत्याने ‘बिग बॉस मराठी’चा पहिला सीझनही गाजवला होता. तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात झळकला होता. करोना काळात त्याच्या पत्नीचं निधन झालं. त्या काळात भूषणबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या, त्यामुळं एक वेळ अशी आली की त्याला हा शो सोडावा लागला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.