
मंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये विविध विषयांवर भाष्य केले. एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर त्यांनी भाष्य केले. गणेश नाईक यांच्या मेळाव्यावर त्यांनी भाष्य केले. लोकसभेला कसा विजय मिळाला, यावरून त्यांनी विरोधकांना टोमणा लगावला.मंत्री संजय शिरसाट हे संभाजीनगरमध्ये असून त्यांनी अनेक विषयांवर थेट भाष्य केले. एसटी महामंडळाची अवस्था वाईट असून लवकरात लवकर पेमेंट देण्याचे काम सुरू असल्याचे शिरसाटांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून एसटीचा मुद्दा हा चांगलाच गाजताना दिसला. गणेश नाईकांबद्दल बोलताना शिरसाट म्हणाले, दोन्ही पक्षांचा मिक्सिंग करू नका.
प्रत्येक मंत्र्याला कोणत्याही भागात जाऊन मेळावे घेण्याचा अधिकार आहे .यांचा महापौर होईल किंवा त्यांचा पक्ष वाढवण्याचा गणेश नाईक आणि सहकारी करत असतील यावर आक्षेप नाही.जमीन अतिक्रमित आहे असे म्हणणे चुकीचे आहे. मंदिर उभे राहिले त्याला 50 वर्ष झाले. मात्र, वक्फ बोर्ड नोटीस देत असून हे चुकीचे आणि आमचा विरोध आहे. त्याचे अतिक्रमण करता येणार नाही. वक्फ बोर्डाच्या नावे झालेले घोटाळे बाहेर येतील, असेही शिरसाट यांनी म्हटले.
तटकरेंबद्दल म्हणाले, अमित शाह मोठे नेते असून हा वाद अमित शाह यांच्यापर्यंत जाणार नाही. त्यांनी फक्त निमंत्रण दिले आहे .हा मुद्दा उपस्थित झाला तर काहींच्या पोटात दुखायला लागले. औरंगजेबची पिलावळ यांचे बाप हे हैद्राबाद येथून येथे येतात आणि यांना बाप बोलण्याची सवय आहे. मी हा मुद्दा मांडणार. आदित्य ठाकरे मोठे नेते असून चंद्रकांत खैरे यांनी बोलू नये.त्यांनी मंत्री पदाच्या काळात मातोश्रीसाठी काय काय केले हे आम्हाला माहीत आहे. खैरे यांचे पक्षासाठी योगदान आहे. खैरे यांना मातोश्रीवर किंमत नाही. त्यांनी यावे त्यांचे स्वागत आहे. अंबादास दानवे यांचा कार्यक्रम संपला आहे. त्यांचं काम झालं आहे. आम्हाला त्याची आवश्यकता नाही.
Video Player
00:00
00:00