उष्णतेने हैराण झाले! घराबाहेर झोपले अन् काळाने घात केला, भरधाव वेगात आलेल्या कारनं कुटुंबातील 7 जणांना चिरडलं, माय लेकीचा मृत्यू तर…

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये रात्री भीषण अपघातात एका कारने कुटुंबातील 7 जणांना चिरडलं. या अपघातात आई आणि मुलीचा मृत्यू झाला. चार वर्षांच्या मुलासह पाच जणांवर उपचार सुरू आहेत.उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात भरधाव गाडीने एकाच कुटुंबातील सात जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे कुंटूब रस्त्याच्या कडेला झोपलेले होते. या अपघातात आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार वर्षांच्या मुलासह पाच जणांवर उपचार सुरू आहेत. काल (शुक्रवारी) रात्री 10.30 वाजताच्या सुमारास, उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बालापार-टिकरिया रोडवरील रघुनाथपूर भगवानपूर गावाजवळ ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार, एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एकाच कुटुंबातील सात सदस्यांना चिरडलं. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे, उपचार सुरू असताना आई आणि मुलीचा मृत्यू झाला. चार वर्षांच्या मुलासह पाच जणांवर उद्याप उपचार सुरू आहेत. अपघातानंतर नागरिकांनी भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या एका तरुणाला पकडलं.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, लोकांना समजावून सांगितल्यानंतर पोलिसांनी क्रेन बोलावली आणि गाडी तेथून पोलिस ठाण्यात नेण्यात आली.पोलिसांनी अपघाता प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथपूर भगवानपूर गावात बालापार-टिकरिया रोडच्या बाजूला सईदा खातून यांचे घर आहे. उष्णतेमुळे कुटुंबातील सर्व सदस्य घराबाहेर रस्त्याच्या कडेला खाटांवर झोपले होते. रात्री 10.30 वाजता एक वेगवान कार मंगळस्थानहून बाळापारकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नाची पार्टी गाडीत होत होती. गाडी इतक्या वेगाने जात होती की ती नियंत्रणाबाहेर गेली आणि डाव्या बाजूला रस्त्यावरून खाली घसरली. यादरम्यान, घरासमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या खाटेवर झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना कारने चिरडलं.

कारने चिरडल्याने सईदा खातून (30) आणि त्यांची मुलगी सुफिया (16) यांच्यासह कुटुंबातील सदस्य बद्रे आलम (17), राबिया (32), मरियम (50), जुबैर (14) आणि निहाल (04) जखमी झाले. त्या सर्वांना बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, मात्र, उपचारांदरम्यान सईदा खातून आणि मुलगी सुफिया यांचा मृत्यू झाला.घटनेनंतर संतप्त लोकांनी गाडी ताब्यात घेतली. गाडीतील चार जण पळून जाऊ लागले. पण, लोकांनी त्यापैकी एकाला पकडले, आणि त्याला मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. लोकांचा रोष पाहून गुलरीहा आणि चिलुआताल पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना समजावून गाडी ताब्यात घेतली. एसपी सिटी अभिनव त्यागी म्हणाले की, अपघातात दोघांचा मृत्यू झाला. जखमींवर बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे. एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.