22 एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. दोन्ही देशात युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. त्यांनी एक प्रस्ताव दिला आहे.पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. त्यांनी एक प्रस्ताव दिला आहे. पाकिस्तानने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले, “पाकिस्तान पहलगाम हल्ल्याची ‘तटस्थ’ चौकशी करण्यास तयार आहे.” पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 भारतीय पर्यटक मारले गेले. या घटनेमुळे पाकिस्तानवर जगभरातून टीका होत आहे.
काकुलमध्ये पाकिस्तान मिलिटरी अकादमीच्या पासिंग-आऊट परेडमध्ये बोलताना शहबाज शरीफ म्हणाले, “पहलगामची घटना म्हणजे एकमेकांवर आरोप करण्याची खेळी आहे. हे आता थांबायला हवे. एक जबाबदार देश म्हणून पाकिस्तान या प्रकरणाच्या कोणत्याही ‘तटस्थ’, ‘पारदर्शक’ आणि ‘विश्वसनीय’ चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे.”शहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या लष्कराचा जुनाच राग आळवला आहे. त्यांनी काश्मीरला पाकिस्तानच्या ‘गळ्याची नस’ म्हटले आहे. ते म्हणाले, “काश्मीर पाकिस्तानच्या गळ्यातील नस आहे.” पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यात 26 लोक मारले गेले. यात बहुतेक पर्यटक होते. 2000 नंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ही संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे.या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक बिघडलेआहेत. भारताने सिंधू जल करार (IWT) स्थगित केला आहे.









