मुंबईत किती पाकिस्तानी? पोलिसांकडून आकडेवारी जारी, पहलगाम हल्ल्यानंतर आजपासून मोठी कारवाई.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारने भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ परत जाण्यास सांगितले आहे.जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. निष्पाप नागरिकांवर गोळीबार करत त्यांना ठार केलं. हा हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर देशातील सरकारनेही कठोर कारवाई करत अनेक मोठे निर्णय घेतले. त्यापैकी एक म्हणजे भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांनी ४८ तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्र, मुंबईत राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांना तात्काळ भारत सोडण्याचं सांगितलं.

यानंतर आता मुंबईत किती पाकिस्तानी वास्तव्यास आहेत, याची आकडेवारी समोर आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत.आज शनिवारी ९ पाकिस्तानी लोकांना पाकिस्तान सोडून जाण्याचे कागदपत्र देण्यात येणार आहेत. इतर ३ पाकिस्तानी लोकांना उद्या रविवारी कागदपत्र दिली जाणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर ही कारवाई केली जात आहे.पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानविरोधात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. भारतातील पाकिस्तानी लोकांना भारत सोडण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे पाकिस्तानात असलेल्या आपल्या भारतीयांना परत भारतात येण्याचं सांगण्यात आलं आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पाकिस्तानी लोकांना भारत सोडण्यासाठी कागदपत्र दिली जात आहेत.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संघटना द रेजिस्टेंट फ्रंटने पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यादरम्यान M4 कार्बाइन आणि AK-47 सारख्या हत्यारांचा वापर केला होता. या हल्ल्यावेळी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात पर्यटक सुट्ट्यांचा, खोऱ्यातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत होते. मात्र त्याचवेळी हा आनंदाचा क्षण दु:खात बुडाला.दहशवादांनी एकामागे एक २६ लोकांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यावेळी पर्यटकांना त्यांचा धर्म, आयडी, नमाज अदा करता येतो का असे अनेक प्रश्न विचारुन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात जवळपास सर्व पुरुषांवर त्यांच्या कुटुंबासमोरच पत्नीसमोर, मुलांसमोर डोक्यात, पोटात गोळ्या झाडल्या. या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली असून या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.