औरंगजेबदेखील फिका पडेल, त्याने आपल्या पत्नीला जेलमध्ये टाकलं नसेल, करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका.

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना औरंगजेबदेखील फिका पडेल अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे. माझा २७ वर्षांचा प्रवास क्रूर वृत्तीचा होता असंही त्या म्हणाल्या.राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्यातील वाद कोर्टात आहे. कोर्टाने दोघांचं लग्न झाल्याचं म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंविरोधात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली. धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्याविरोधात केलेल्या आरोपात कोणतंही तथ्य नसल्यानं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना करुणा मुंडेंना दर महिना दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचा निर्णय कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे.दरम्यान, करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर वृत्तीचे आहेत. औरंगजेबाने आपल्या बायका-पोरांचे कधीही हाल केले नाहीत, अशी व्यथा करुणा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

कोर्टाचा निर्णय करुणा मुंडे यांच्या बाजूने लागला असून करुणा यांनी न्यायाधिशांचे आभार मानत त्यांनी हे लग्न झालं असल्याचं म्हटलं आहे. एखाद्या आमदार, मंत्र्याच्या पत्नीला त्याच लिव्हिंग स्टँडर्स्डमध्ये राहण्याचा अधिकार असून त्यांना हा खर्च करावा लागणार आहे. न्यायालयाने मला दिलेल्या न्यायामुळे मी संतृष्ट आहे, असं करुणा मुंडे म्हणाल्या.पुढे त्या म्हणाल्या, की ‘मागील २७ वर्ष जो संघर्षाचा काळ होता, तो आता पूर्ण झाला आहे. ज्यावेळी आम्ही भेटलो होतो, त्यावेळी आम्ही दोघंही विद्यार्थी होतो, तेव्हाच्या विद्यार्थीपासून ते आता मंत्रीपदापर्यंत पोहोचण्यापर्यंत आम्ही दोघांनी संघर्ष केला आहे, मी माझी प्रॉपर्टी विकली, मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं, तो संघर्ष आम्ही दोघांनी सोबत केला आहे.

पण मंत्री झाल्यानंतर तुम्ही ऐष करता, हे सर्व मी पुराव्यासहित देणार आहे, मी गप्प बसणार नाही. माझ्यासोबत झालं ते ज्याप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरण क्रूर वृत्तीने झालं, तसंच क्रूर वृत्ती माझ्यासोबत झाली आहे.”सर्व गोष्टी मी कोर्टात दिलेल्या नाहीत, जसं-जसं केस पुढे जाईल, तसे मी पुरावे उघड करणार आहे. माझ्या आईची आत्महत्या, मी २००८ मध्ये स्वत: विष प्राशन केलं होतं, पाच दिवस मी नोव्हेंबर २००८ मध्ये रुग्णालयात भरती होती. माझ्यावर दोन खोट्या केस करुन मला जेलमध्ये टाकलं. ४५ दिवस येरवडा जेलमध्ये ठेवलं. हे अतिशय क्रूर होतं. औरंगजेबदेखील फिका पडेल, इतक्या नीच वृत्तीचे हे लोक आहेत. औरंगजेबनेही आपल्या पत्नीला जेलमध्ये टाकलं नसेल. माझा २७ वर्षांचा प्रवास क्रूर वृत्तीचा होता. आपल्या मुला-बाळांचं तोंड बघून गप्प राहिले. आमच्या घरगुती हिंसाचारामध्ये जे – जे लोक आहेत त्या सर्वांना शिक्षा होणार आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहे. केवळ धनंजय मुंडे नाही, तर सर्व गुंड गँगला जेल होणार आहे’, असा विश्वास व्यक्त करत करुणा मुंडे यांनी त्यांच्या निकालावर न्यायालयाचे आभार मानले आहेत.

  • Related Posts

    जळगावातील रिक्षाचालकाच्या घरावर तिघांनी केला गोळीबार.

    जुन्या वादातून मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी भागात राहणाऱ्या २६ वर्षीय रिक्षाचालकाच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना २४ एप्रिलच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने गोळी लोखंडी गेटवर आदळून तिचे तुकडे झाले.…

    पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, महिला संतापल्या आणि…

    पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याने संतप्त महिलांनी ताडी केंद्रावर तोडफोड केली. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला असून, महिलांनी अवैध ताडी विक्री बंद करण्याची मागणी केली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावातील रिक्षाचालकाच्या घरावर तिघांनी केला गोळीबार.

    जळगावातील रिक्षाचालकाच्या घरावर तिघांनी केला गोळीबार.

    पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, महिला संतापल्या आणि…

    पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, महिला संतापल्या आणि…

    वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक, प्रकृती बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी .

    वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक, प्रकृती बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी .

    मुख्यमंत्रिपदावरुन चिमटे! बावनकुळेंच्या विधानानंतर भाजप-शिवसेनेची परस्परांना उद्देशून टोलेबाजी.

    मुख्यमंत्रिपदावरुन चिमटे! बावनकुळेंच्या विधानानंतर भाजप-शिवसेनेची परस्परांना उद्देशून टोलेबाजी.