शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या अडचणीत वाढ, आधी अ‍ॅट्रॉसिटी दाखल, आता लाखोंच्या पाणीचोरीचा आरोप.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अडचणीत आले आहेत. त्यांच्यांवर लाखोंची पाणीचोरी केल्याचा आरोप करण्यात आला होतो. त्यानुसार त्यांच्या विरोधात कारवाईही करण्यात आली आहे.शिवसेना ठाकरे गटाचे अकोला जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय, पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी अकोटचे जलप्रदाय विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप गोपाल दातकर वर करण्यात आला होता. तर गोपाल दातकर यांनी २०१० पासून ४,९६,३१२ रुपयाचे पाणी चोरले असल्याचा आरोप त्यांच्या हिंगणी गावातील सरपंचांनी केला आहे. गोपाल दातकर यांनी १६० मी.मी.चा पाईप गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला अवैधरीत्या जोडला असल्याचा आरोप आहे.

दातकर यांनी ही पाण्याची लाईन सुरु करुन स्वतःच्या घरात पाण्याचा वापर केला असल्याचं आरोप होत आहे.या अवैध पाणीचोरी बाबत सरपंच यांनी याआधी जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती तर तत्कालीन कार्यकारी अभियंता व उपअभियंता स्थळपाहणी करिता आले असता अवैध नळ कनेक्शन निदर्शनास आले होते मात्र गोपाल दातकर यांनी अरेरावी करुन सर्वाना तेव्हा हाकलून लावले होते असा आरोप सरपंचांनी केला आहे.अखेर हे अवैध कनेक्शन सदर पाईप व्यास टाकीच्या जवळ तोडून बंद करण्यात आले.अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अकोट येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या विरोधात अट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी आपल्या सर्कलमधील अंदाजे ५० लाखांच्या कामांबाबत चौकशी केली. ‘त्यातून ५ लाख देण्याची व्यवस्था करावी’, अशी मागणी केली. मात्र, इंगळे यांनी याला स्पष्ट नकार दिला. नकार मिळताच, दातकर यांनी धमकी देत जातिवाचक शिवीगाळ केली व “तुमच्या सर्कलमध्ये पाणी मिळू नये” असा मुद्दा उपस्थित केला. हा संवाद इंगळे यांनी स्वतःच्या मोबाइलमध्ये अर्धवट स्वरूपात रेकॉर्ड केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले . घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार १ एप्रिल रोजी अकोट शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावरून गोपाल रामराव दातकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.