जळगावातील रिक्षाचालकाच्या घरावर तिघांनी केला गोळीबार.

जुन्या वादातून मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी भागात राहणाऱ्या २६ वर्षीय रिक्षाचालकाच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना २४ एप्रिलच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने गोळी लोखंडी गेटवर आदळून तिचे तुकडे झाले. त्यामुळे कुणालाही दुखापत झालेली नाही. रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात मंगळवारी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत राम विश्वास बोरसे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रिक्षा चालवून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. याच भागात त्यांचा मित्र दिनेश भारत चौधरी राहतो.

सन २०२१ मध्ये दोघांत वाद झाला होता. त्यानंतर दिनेश हा राम यांना अधून-मधून शिवीगाळ व दमदाटी करत होता. १ एप्रिललाही राम यांना मारहाण करण्यात आली होती. २४ एप्रिल रोजी भावाला कुसुंबा येथे सोडून रात्री १.१५ वाजता घरी पोहोचले. दरम्यान, घरात प्रचंड उकाडा होत असल्याने लाकडी दरवाजा न लावता केवळ लोखंडी ग्रीलचा दरवाजा लावून बोरसे कुटुंबीय झोपी गेले. तर राम हे जेवण करत होते. जेवण करत असताना राम यांना अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला.

त्यामुळे वडीलांसह त्यांनी दरवाज्याजवळ धाव घेतली. तेव्हा त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये दोन तरूण तर रस्त्यावर बाइकवर एक तरूण बसलेला दिसून आला. राम यांच्या वडिलांनी आरडाओरड करताच कंपाउंडमधल्या दोघांनी दुचाकीकडे धाव घेतली आणि तिघे हल्लेखोर तेथून पसार झाले. मात्र, तिघांमधील एक हा दिनेश चौधरी असल्याचे पोलिसांनी सांगितले. राम बोरसे हे घराबाहेर आल्यावर त्यांना लोखंडी ग्रीलवर गोळी आदळून पुंगळी अडकल्याचे दिसले. त्यांनी तातडीने ही घटना भावाला कळवली. त्यानंतर मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत सांगितल्यावर दिनेश चौधरीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.