भाविकांची अलोट गर्दी, नियोजन चुकलं अन् सप्तश्रृंगीगडावर चेंगराचेंगरीची परिस्थिती, लोकांमध्ये संताप.

 नाशिकातील सप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. गुरुवारी पहाटे अचानक भाविकांची गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती उद्भवल्याचं पाहायला मिळालं.नाशिकातील सप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. चैत्रोत्सवानिमित्ताने Saptshrungi Deviचं दर्शन घेण्यासाठी गटावर भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. गर्दीचं नियोजन चुकलं आणि त्यामुळे पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. यादरम्यान गर्दी सांभाळण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांची मोठी तारांबळ उडाल्याचं दिसून आलं.चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगीगडावर देवीच्या दर्शनासाठी बुधवारी रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली. अचानक गर्दी वाढल्याने पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या गर्दीमुळे पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि मंदिर प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

या चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसत आहेत. कशाप्रकारे गर्दीमध्ये भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मंदिर प्रशासनाचा हा नियोजनशून्य कारभार पाहून भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.बुधवारी रात्रीपासूनच सप्तश्रृंगीगडावर भाविकांचे लोंढेच्या लोंढे पोहोचले. गुरुवार पहाटे पाच वाजेनंतर भाविकांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली. त्यामुळे मंदिर प्रशासनावर ताण निर्माण झाला. भाविकांचं दर्शन सुरळीत पार पाडण्यासाठी पायऱ्यांवर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र, गर्दी प्रचंड वाढल्याने काही ठिकाणचे बॅरिकेड्स तुटले आणि ही चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये लहान मुलं, महिला आणि वृद्ध भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते पाटील चौक दवाखाना आणि वेटिंग हॉलपर्यंत बाऱ्यांचे जाळे उभे करण्यात आले होते. पण, वेटिंग हॉलखाली एकही पोलीस कर्मचारी नसल्याने तिथे भाविकांची गर्दी जमली आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. हे बॅरिकेड्स जुनी आणि मोडकळीस आल्याने गर्दीच्या प्रेशरने त्या तुटल्या. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली. गर्दी होणार आहे हे माहित असतानाही मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी त्यासाठी काहीही तयारी केली नसल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
भवानी चौकात लावलेल्या बॅरिकेड्समुळे परिसरातील व्यवसायिकांचे व्यापार ठप्प पडले. बॅरिकेड्समुळे ग्राहक दुकानांपर्यंत पोहोचू शकले नसल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.

  • Related Posts

    अनिल राणेंची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई; जिद्दीला सलाम.

    रामदास कॉलनीतील अनिल राणे यांनी जगातील सर्वात खडतर आणि लोकप्रिय ट्रेक्सपैकी एक मानल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकची यशस्वी पूर्तता करून जिद्द, चिकाटी आणि मानसिक बळ याचे उत्तम उदाहरण सादर…

    जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशन ची स्थापना . घर घर रक्तदाता, हर घर रक्तदाता…” या घोष वाक्य द्वारे रक्तमित्र ही संकल्पना राबवणार..

    घर घर रक्तदाता, हर घर रक्तदाता…” या घोष वाक्य द्वारे रक्तमित्र ही संकल्पना राबवणार..जळगाव जिल्ह्यातील रक्तदात्यांना संघटित करून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याच्या पवित्र उद्देशाने जळगाव जिल्हा रक्तदाता…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अनिल राणेंची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई; जिद्दीला सलाम.

    अनिल राणेंची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई; जिद्दीला सलाम.

    जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशन ची स्थापना . घर घर रक्तदाता, हर घर रक्तदाता…” या घोष वाक्य द्वारे रक्तमित्र ही संकल्पना राबवणार..

    जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशन ची स्थापना . घर घर रक्तदाता, हर घर रक्तदाता…” या घोष वाक्य द्वारे रक्तमित्र ही संकल्पना राबवणार..

    रिलेशनशिपमध्ये राहण्यास जबरदस्ती, अल्पवयीन मुलीने नकार देताच मुलाकडून ठार मारण्याची धमकी, मुलीला घरी नेले, पण…

    रिलेशनशिपमध्ये राहण्यास जबरदस्ती, अल्पवयीन मुलीने नकार देताच मुलाकडून ठार मारण्याची धमकी, मुलीला घरी नेले, पण…

    मुंबई-नाशिक महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; 8 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, 10 ते 12 जण जखमी, 3 गंभीर .

    मुंबई-नाशिक महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात;  8 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, 10 ते 12 जण जखमी, 3 गंभीर .