भाविकांची अलोट गर्दी, नियोजन चुकलं अन् सप्तश्रृंगीगडावर चेंगराचेंगरीची परिस्थिती, लोकांमध्ये संताप.

 नाशिकातील सप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. गुरुवारी पहाटे अचानक भाविकांची गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती उद्भवल्याचं पाहायला मिळालं.नाशिकातील सप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. चैत्रोत्सवानिमित्ताने Saptshrungi Deviचं दर्शन घेण्यासाठी गटावर भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. गर्दीचं नियोजन चुकलं आणि त्यामुळे पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. यादरम्यान गर्दी सांभाळण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांची मोठी तारांबळ उडाल्याचं दिसून आलं.चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगीगडावर देवीच्या दर्शनासाठी बुधवारी रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली. अचानक गर्दी वाढल्याने पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या गर्दीमुळे पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि मंदिर प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

या चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसत आहेत. कशाप्रकारे गर्दीमध्ये भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मंदिर प्रशासनाचा हा नियोजनशून्य कारभार पाहून भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.बुधवारी रात्रीपासूनच सप्तश्रृंगीगडावर भाविकांचे लोंढेच्या लोंढे पोहोचले. गुरुवार पहाटे पाच वाजेनंतर भाविकांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली. त्यामुळे मंदिर प्रशासनावर ताण निर्माण झाला. भाविकांचं दर्शन सुरळीत पार पाडण्यासाठी पायऱ्यांवर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र, गर्दी प्रचंड वाढल्याने काही ठिकाणचे बॅरिकेड्स तुटले आणि ही चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये लहान मुलं, महिला आणि वृद्ध भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते पाटील चौक दवाखाना आणि वेटिंग हॉलपर्यंत बाऱ्यांचे जाळे उभे करण्यात आले होते. पण, वेटिंग हॉलखाली एकही पोलीस कर्मचारी नसल्याने तिथे भाविकांची गर्दी जमली आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. हे बॅरिकेड्स जुनी आणि मोडकळीस आल्याने गर्दीच्या प्रेशरने त्या तुटल्या. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली. गर्दी होणार आहे हे माहित असतानाही मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी त्यासाठी काहीही तयारी केली नसल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
भवानी चौकात लावलेल्या बॅरिकेड्समुळे परिसरातील व्यवसायिकांचे व्यापार ठप्प पडले. बॅरिकेड्समुळे ग्राहक दुकानांपर्यंत पोहोचू शकले नसल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.

  • Related Posts

    मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध, रात्री रस्त्यात गाठलं अन्… इस्टेट एजंटच्या हत्येने पुणे हादरलं.

    पुण्यात एका इस्टेट एजंटची हत्या करण्यात आली आहे. मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे.मेहुणीच्या अनैतिक संबंधाला विरोध…

    दुदैवी! चंद्रपुरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक, गावातील दोघांचा मृत्यू.

    चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोठी दुर्घटना घडली. पहिल्या घटनेत, नागभीड तालुक्यात दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत रमेश दडमल आणि राकेश बदन या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे, सिंदेवाहीजवळ तेंदुपत्ता तोडण्यासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध, रात्री रस्त्यात गाठलं अन्… इस्टेट एजंटच्या हत्येने पुणे हादरलं.

    मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध, रात्री रस्त्यात गाठलं अन्… इस्टेट एजंटच्या हत्येने पुणे हादरलं.

    दुदैवी! चंद्रपुरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक, गावातील दोघांचा मृत्यू.

    दुदैवी! चंद्रपुरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक, गावातील दोघांचा मृत्यू.

    आरोग्य सेविका वैशाली विलास तळेले यांना दिशा जिल्हास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्राप्त.

    आरोग्य सेविका वैशाली विलास तळेले यांना दिशा जिल्हास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्राप्त.

    हिंदू-मुस्लिम करुन मूर्खपणा! भारताकडून पाकची दाणादाण, आर्मी चीफवर भडकले पाकिस्तानी प्रोफेसर.

    हिंदू-मुस्लिम करुन मूर्खपणा! भारताकडून पाकची दाणादाण, आर्मी चीफवर भडकले पाकिस्तानी प्रोफेसर.