कोणताही देश १०० टक्के अचूक गुप्तचर माहितीची हमी देऊ शकत नाही… पहलगाम हल्ल्यानंतर शशी थरूर यांचं मोठं विधान.

 काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली. हा हल्ला गुप्तचर यंत्रणेचं अपयश असल्याचं ते म्हणाले. त्यांनी या हल्ल्याची तुलना इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याशी केली. अनेकदा हल्ले रोखले जातात, पण अपयश आलं की चर्चा होते, असंही थरूर म्हणाले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा गुप्तचर यंत्रणेचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी या हल्ल्याची तुलना ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी केली आहे.’गुप्तचर माहिती पूर्णपणे अचूक नव्हती. यामध्ये काही अपयश आलं. पण आपल्याकडे इस्रायलचं उदाहरण आहे, ज्याला जगातील सर्वोत्तम गुप्तचर सेवांपैकी एक मानलं जातं, तरीही त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी ७ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावरील हल्ल्याने सर्वांनाच हैराण करण्यात आलं. आपण आधी सध्याच्या संकटावर मात केली पाहिजे आणि नंतर सरकारकडून जबाबदारीची मागणी केली पाहिजे.

कोणताही देश १००% अचूक गुप्तचर माहितीची हमी देऊ शकत नाही.’थरूर म्हणाले की, ‘अनेक वेळा दहशतवादी हल्ले यशस्वीरित्या रोखले जातात. तेव्हा त्याची चर्चा होती नाही, तेव्हा याकडे कोणीही लक्ष देत नाही. पण जेव्हा ते हल्ले थांबवण्यात अपयशी ठरतात, तेव्हा त्यांच्याबद्दल चर्चा होते. काही कमतरता आहे, पण सध्या लक्ष संकटावर केंद्रित केलं पाहिजे. लगेच कोणालाही दोष देऊ नये.’दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा एनआयएकडून तपास सुरू आहे.

शांत आणि सुंदर बैसरन खोऱ्यात हा भयानक हल्ला झाल्यानंतर आयजी, डीआयजी आणि एसपी यांच्या नेतृत्वाखालील पथकं चौकशी करत आहेत. काश्मीरमधील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या या हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्या घटनांचा क्रम समजून घेण्यासाठी प्रत्यक्षदर्शींची बारकाईने चौकशी केली जात आहे.दहशतवाद्यांच्या कारवाया तपासण्यासाठी एनआयएचं पथक त्यांच्या प्रवेशाच्या आणि हल्ल्यानंतर बाहेर पडलेल्या ठिकाणांची बारकाईने तपासणी करत आहेत. या हल्ल्यामागील कट उलगडण्यासाठी फॉरेन्सिक आणि इतर तज्ञांच्या मदतीने पथकं संपूर्ण परिसराची कसून तपासणी करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.