जीव देण्यापूर्वी डॉ. वळसंगकरांचे चौघांना फोन, CDRमध्ये धक्कादायक माहिती, प्रकरणाला मिळणार वेगळं वळण.

न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या फोनच्या सीडीआरवरुन बरीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर करण्यापूर्वी चौघांना फोन केल्याची माहिती आहे.प्रख्यात न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सदर बाजार पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांच्या मोबाईलवरील सीडीआर प्राप्त केला असून ज्यादिवशी त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली, त्या दिवसभरात डॉक्टरांच्या मोबाईलवर 27 कॉल आले होते, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तसेच, आपली आयुष्य संपवण्यापूर्वी त्यांनी रात्री आठ वाजेनंतर चौघांना फोन केल्याची माहिती आहे. ते चौघे कोण, याचा तपास सध्या सुरु आहे.डॉ. वळसंगकर यांच्या मृत्यू प्रकरणात एसपी न्यूरोसायन्स रुग्णालयातील महिला कर्मचारी मनीषा मुसळे मानेला अटक झाली असून सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.

मनीषा मानेचे वकील ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे जामीनासाठी अर्ज करणार आहेत. एका ई-मेल वरून डॉक्टर आपला जीव कसे देऊ शकतात, असा दावा ऍड प्रशांत नवगिरे करत आहेत. मनीषाने ईमेल मधून व्यथा मांडली होती, वस्तुस्थिती वेगळी आहे, सीडीआरमधून महत्वाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे, आयुष्य संपवण्यापूर्वी डॉक्टरांच्या मोबाईलवर कुणाचे कॉल आले होते, असे अनेक मुद्दे ऍड प्रशांत नवगिरे कोर्टात मांडणार आहेत.ऍड प्रशांत नवगिरे यांचे म्हणण्यानुसार, डॉ. वळसंगकरांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी मनीषा पोलीस कोठडीनंतर सध्या ९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. मनीषाला यापूर्वी पाच दिवस पोलीस कोठडी सुनावलेली आहे, त्यामुळे तिचा प्राथमिक तपास संपलेला आहे, असे दिसून येते. तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही.

दोन मुलांची जबाबदारी तिच्यावर आहे, असं ऍड प्रशांत नवगिरे यांचे म्हणणे आहे.डॉक्टरांच्या मृत्यू प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे. मनीषा माने या महिला कर्मचाऱ्यास खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. सदर हॉस्पिटलमध्ये सन २००८ पासून सेवा बजावत आली आहे. गुन्हा दाखल होईपर्यंत फिर्यादी अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून कोणतेही आरोप केलेले नव्हते. आरोपाप्रमाणे मनीषा त्रासदायक होती तर तिला जबाबदारी दिली नसती. तिला त्याच वेळी नोकरीवरून कमी केले असते अथवा तिच्याविरुद्ध तक्रारी झाल्या असत्या, असे आरोपींच्या वकिलांचे म्हणणे आहेडॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट त्यांच्याच हस्ताक्षरातील आहे का? याच्या पडताळणीसाठी पोलिसांनी गुरुवारी २४ एप्रिल रोजी रुग्णालयातून डॉक्टरांचे हस्ताक्षर व स्वाक्षरी असलेली काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यावरील हस्ताक्षर एकच आहे का? या पडताळणीसाठी कागदपत्रे हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली आहेत. त्याचा रिपोर्ट पुढील आठवड्यात मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.