माझ्या बायकोचं परपुरुषासोबत अश्लील कृत्य, ‘त्या’ साईटवर मी व्हिडिओ पाहिला, पतीची तक्रार, नागपुरात खळबळ.

‘एका अनोळखी व्यक्तीने मला माहिती दिली की, एका अश्लील साइटवरील व्हिडीओत माझी पत्नी एका पुरुषासोबत आक्षेपार्ह कृत्य करताना दिसते आहे’, असा आरोप पतीने याचिकेत केला आहेमाझी पत्नी एका आक्षेपार्ह साइटवरील व्हिडीओमध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत अश्लील कृत्ये करीत आहे’, अशी याचिका दाखल करीत पतीने थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. मात्र, पतीच्या आरोपाला सबळ पुराव्याचे बळ नसल्याने उच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला आहे.पतीने या प्रकरणी अब्रूनुकसानी अंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्याच्या तक्रारीनुसार, पत्नीने घरात अश्लील भाषा वापरून त्यांची मानहानी केली. मात्र, त्याचे पुरावे तो सादर करू शकला नाही.‘एका अनोळखी व्यक्तीने मला माहिती दिली की, एका पॉ*र्न साइटवरील व्हिडीओत माझी पत्नी एका पुरुषासोबत अश्लील कृत्य करताना दिसते आहे’, असा आरोप पतीने याचिकेत केला. आपण हा व्हिडीओ बघितला असून यातील महिला आपली पत्नीच असल्याचाही दावा त्याने केला. यासाठी पतीने आयटी कायद्याच्या ६६अ, ६७अ व ६७ब या कलमांचा आधार घेतला.पतीच्या याचिकेवर न्या. एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले की, ‘तक्रारीत आरोपी पत्नीने व्हिडीओ स्वतः अपलोड केल्याचा आरोप नाही किंवा तसे सिद्धही होत नाही.

त्यामुळे आयटी कायद्याच्या अंतर्गत हे सिद्ध होत नाही की, तिने काही अनैतिक बाबी प्रसारित केल्या. ही तक्रार केवळ संशय आणि भावनांवर आधारित आहे. कायदेशीर कारवाईसाठी ठोस पुरावे आवश्यक असून याप्रकरणी ते सादर झाले नाहीत.’दुसरीकडे, ‘माझी पत्नी बेपत्ता असून तिच्या माहेरच्यांनीच तिला पळवून नेले आहे, प्रशासनाने तिला शोधून द्यावे’, अशी आर्त विनंती जिल्ह्यातील खापा गावातील एका २६ वर्षीय तरुणाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे केली आहे. विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीला वडिलांनी हृदयविकाराच्या बहाण्याने बोलावून नेले आणि तेव्हापासून ती बेपत्ता असल्याचा आरोप त्याने याचिकेत केला आहे.याचिकाकर्त्याने ॲड. ए. ई. निमगडे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेनुसार, ‘२५ एप्रिल २०२४ रोजी या युवकाचा विवाह झाला. त्यानंतर केवळ एकच दिवस पत्नी त्याच्या घरी राहिली. त्यानंतर तिच्या नातलगांनी त्यांना वेगळे केले.

’पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा दावाही या तरुणाने केला आहे. पत्नीने गुप्त भेटीदरम्यान ‘वडिलांच्या आजाराचे कारण खोटे होते’, असे सांगितले होते. तसेच पत्नीच्या कुटुंबाला राजकीय आणि आर्थिक पाठबळ आहे, असा आरोप या तरुणाने केला आहे. खापा पोलिस ठाण्यात तक्रार देताना पोलिसांनी माझ्यावरच दबाव आणून पत्नीशी संपर्क साधण्यास मनाई केली. याप्रकरणी सावनेर पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्यानंतरही ठोस कारवाई झालेली नाही, असे या युवकाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.‘माझी पत्नी शोधून द्या’, अशी मागणी युवकाने याचिकेत केली आहे. सासरच्यांच्या दडपशाहीमुळे तिला जबरदस्तीने दुसऱ्या लग्नात ढकलले जाण्याची भीती आहे, अशी भीतीही त्याने याचिकेतून व्यक्त केली आहे. न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने सासरच्या मंडळींना नोटीस बजावून २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.