साखरपुडा झाला, महिन्यावर लग्न आलं असताना तरूणाने संपवलं जीवन, सोलापूर हादरलं.

सोलापूर शहरातील मोदी परिसरात धक्कादायक घटना घडली. एका बिगारी काम करणाऱ्या सागर गोपीरेड्डी नावाच्या तरुणाने आत्महत्या केली. त्याचा नुकताच साखरपुडा झाला होता आणि पुढील महिन्यात त्याचे लग्न होणार होते. त्याने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.सोलापूर शहर येथील मोदी परिसरामध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहर येथील बिगारी काम करणाऱ्या तरूणाने आपलं जीवन संपवलं आहे. साखरपुडा झाल्यावर महिन्यावर लग्न आले असताना तरूणाने टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्क बसला आहे. सागर बाबू गोपीरेड्डी (वय रा. शोभानगर, २७, मोदी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली.

ही घटना रविवारी सकाळी सोलापूर शहरातील मोदी परिसरात घडली आहे. सागरचा साखरपुडा नुकताच झाला होता. पुढील महिन्यात लग्न करण्याचे नियोजन करण्यात येत होते.सागरने असे का केले, त्याच्या मनातील सागरने आम्हाला सांगायचं होतं असे म्हणत त्याच्या नातेवाइकांनी हंबरडा फोडला होता. घरात कोणी नसल्याची संधी साधत सागरने घरातील वाशाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना रविवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. शेजाऱ्यांनी ही घटना पाहिल्यानंतर लक्षात आली. बेशुद्धावस्थेत सागरला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी सागरला मृत घोषित केले.सागरची घरची परस्थिती हलाखीची आहे.

हलाखीच्या परिस्थितीत सागर आणि त्याचे कुटुंबीय संसाराचा गाडा हाकत होते. सागरची आई ही वाडपी म्हणून काम करते, तर वडील हे मंडप दुकानात मजुरीचे काम करतात. सागर हा बिगारी बांधकाम क्षेत्रात मजूर म्हणून काम करत होता. त्याने अचानक रविवारी टोकाचे पाऊल उचलले. पण इतका मोठा निर्णय तरूणाने का घेतला याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.दरम्यान,सागरचा गोपीरेड्डी या तरुणाचा साखरपुडा नुकताच झाला होता. पुढील महिन्यात लग्न करण्याचे नियोजन करण्यात येत होते. लग्न होण्याअगोदर सागरने टोकाचे पाऊल उचलले. सागरने गळफास घेतल्याची माहिती होताच नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला.सागरच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात हंबरडा फोडला होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.