शोभायात्रेत गोळीबार करण्याचा गुंडांचा कट फसला, नागपुरात धक्कादायक प्रकार उघड.

नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शोभायात्रेत गोळीबार करून दंगल घडवण्याचा कट कुख्यात गुंडाच्या टोळीने रचला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलला पांढराबोडीतून निघणाऱ्या शोभायात्रेत गोळीबार करून शहरात दंगल घडविण्याचा कट कुख्यात बंटी हिरणवार व त्याच्या टोळीने आखला होता, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी रविवारी गिट्टीखदानमधील गुन्हेशाखेच्या कार्यालयात पत्रकारांना ही माहिती दिली.सोशा कॅफेचालक अविनाश भुसारी हत्याकांडात गुन्हेशाखा पोलिसांनी शैलेश ऊर्फ बंटी विनोद हिरणवार (वय ३१), अंकित ऊर्फ बाबू धीरज हिरणवार (वय २२), आदर्श ऊर्फ गोट्या रत्नाकर वालके (वय २०), शिबू राजेश यादव (वय २०) व रोहित ऊर्फ भिक्कू राजू मेश्राम (वय २०) या पाच जणांना अटक केली. पोलिसांनी त्यांची तीन दिवस पोलिस कोठडी घेतली आहे.

 खापरखेड्यात शेखू टोळीतील प्रवेश गुप्ता, अविराज भुसारी व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करून बंटीचा भाऊ पवन याची हत्या केली. यात बंटीही जखमी झाला.दोघांच्या हत्येचा कट आखला. प्रवेश हा १४ एप्रिलला शोभायात्रा काढत असल्याची माहिती बंटीला होती. या शोभायात्रेत गोळीबार करून प्रवेशची हत्या करायची व शहरात दंगल घडवून पसार व्हायचे, असा कट बंटीने आखला. त्यानुसार १४ एप्रिलला बंटी व त्याचे साथीदार सायंकाळी पांढराबोडीत गेले. मात्र, शोभायात्रेत प्रवेश आला नाही. त्यामुळे बंटीने गोळीबार केला नाही. धीरजही त्यांना सापडला नाही. दोघेही बचावले.प्रवेश व त्याच्या साथीदारांची हत्या करयासाठी बंटीला पिस्तुलाची गरज होती. मात्र, त्याच्याकडे पैसे नव्हते. शिबू याने नातेवाईक महिलेकडील १ लाख २० हजार रुपये चोरी केले.

ऑटोचालक शाहीद याच्याकडून प्रत्येकी ४५ हजार रुपयांना तीन पिस्तुले खरेदी केली. त्यानंतर ३० काडतुसेही अन्य एकाकडून खरेदी केली.शेखू याने अविराज व साथीदारांच्या मदतीने पवन व बंटीच्या हत्येचा कट आखला. अविराज याने याबाबत अविनाशला माहिती दिली होती, डिसेंबर महिन्यात अविनाशने अब्बास ऊर्फ आबू खान याला याबाबत कळविले होते. आबूने बंटी हिरणवारला खून होणार असल्याची माहिती दिली. अविनाशनेच याबाबत सांगितल्याचेही त्याने बंटीला सांगितले. १४ एप्रिलला प्रवेश आढळला नाही. मात्र, १५ एप्रिलला मध्यरात्री बंटी व त्याच्या साथीदारांना अविनाश हा कॅफेसमोर दिसला. बंटी व त्याच्या टोळीने डोक्यात चार गोळ्या झाडून अविनाशची हत्या केली व पसार झाले. घटनेनंतर पोलिसांनी बंटी, बाबू व त्याच्या टोळीवर हायटेक पाळत ठेवायला सुरुवात केली. अखेर बंटी, बाबूसह पाच जणांना भंडारा, गोंदिया व बल्लारशाह येथे पकडण्यात पोलिसांना यश आले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.