राहत्या घरातच जोडप्याचा गूढ मृत्यू; नवऱ्याच्या हातात, बायकोच्या भांगेत कुंकू, मुलाला वेगळाच संशय.

 राहत्या घरात एका जोडप्याचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या दाम्पत्याने आपल्या आयुष्याची अखेर केली की त्यांची हत्या करण्यात आली, याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.एका जोडप्याचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या मृत दाम्पत्याच्या हातावर कुंकू लागलेलं होतं, तर पत्नीच्या भांगेत आणि पतीच्या गळ्यावरही कुंकू लागलेलं आढळून आलं. या घटनेची माहिती मिळताच बरियातू पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी मृत दाम्पत्याचा मृतदेह ताब्यात घेतले. सध्या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून या दोघांनी आपलं आयुष्य संपवलं की त्यांची हत्या करण्यात आली आहे, याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.पोलिसांनी पती-पत्नी दोघांचे मृतदेह ज्या खोलीत संशयास्पद अवस्थेत आढळून आले त्या खोलीचा कसून तपास केला आहे, जेणेकरुन कुठलाही पुरावा सुटू नये.

प्रसादी साओ आणि त्यांची पत्नी कुर्मी देवी असे मृत जोडप्याचे नाव असून ते लातेहार जिल्ह्यातील बरियातू पोलीस स्टेशन क्षेत्रातील हेसला गावातील रहिवासी आहेत. मयत दाम्पत्य मुलापासून वेगळे दुसऱ्या घरात राहत होते. मृताचा मुलगा व इतर कुटुंबीयांनी दोघांचाही सुनियोजित खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.तर दुसरीकडे, या पती-पत्नीचा मृत्यू काळ्या जादूमुळे झाल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरु आहे. दोघांच्या हातावर कुंकू, पत्नीच्या भांगेत कुंकू, तर नवऱ्याच्या गळ्यावर कुंकू असल्याचे दिसून आले. सध्या बरियातू पोलीस ठाण्याचे पोलीस या दाम्पत्याची हत्या आणि आयुष्याची अखेर यासह सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे गूढ उकलणार आहे.या दाम्पत्याच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे आई-वडील त्याच्या घराच्या बाजूलाच राहत होते, ते रात्री जेवण करुन झोपी गेले. सकाळच्या सुमारास वडील बाहेरही आले होते. त्यानंतर पुन्हा ते घरात केले. गायीला चारा दिल्यानंतर जेव्हा तो त्याच्या आई-वडिलांच्या घरात गेला तेव्हा त्याला दिसलं की दोघेही निपचित पडलेले होते. आवाज दिल्यावरही दोघांपैकी कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ना घरात काही वादविवाद होता ना कोणाशी त्यांचं काही वैर होतं, असंही मुलाने सांगितलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.