परीक्षा संपल्याचा आनंद, वडापाव खाण्यासाठी गेले, पण काळाने डाव साधला, अन् जीवलगांचा जीव गेला.

 सातारा तालुक्यातील सज्जनगड – सातारा रस्त्यावर सज्जनगडहून डबेवाडीच्या दिशेने घरी दुचाकीवर ट्रिपल सीट निघालेल्या दोन अल्पवयीन युवकांचा समोरून आलेल्या पिकअप गाडीची जोरात धडक बसल्यामुळे जागीच मृत्यू झाला, तर यातील एक युवक गंभीर जखमी झाला आहे. सातारा- सज्जनगड रस्त्यावर दुपारी डबेवाडीजवळ दुचाकी व पिकअप गाडीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन अल्पवयीन युवक ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. वेदांत शरद शिंदे (वय 15) व प्रज्वल नितीन किर्दत (वय 14) असे मृत झालेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत. या अपघात प्रकरणी पिकअप चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, सातारा तालुक्यातील सज्जनगड-सातारा रस्त्यावर सज्जनगडहून डबेवाडीच्या दिशेने घरी दुचाकीवर ट्रिपल सीट निघालेल्या दोन अल्पवयीन युवकांचा समोरून आलेल्या पिकअप गाडीची जोरात धडक बसल्यामुळे जागीच मृत्यू झाला, तर यातील एक युवक गंभीर जखमी झाला आहे.

त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात वेदांत शरद शिंदे (वय 15 ), प्रज्वल नितीन किर्दत (वय 14, दोघेही अंबवडे खुर्द ता. सातारा) या अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर राहुल भरत देवरे (वय 28, रा. सायळी, ता. जि. सातारा) हा गंभीर जखमी झाला असून त्याला यशवंत Hospital येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सातारा तालुक्यातील सज्जनगड रस्त्यावर डबेवाडी येथे अत्यंत दुर्दैवी हृदयद्रावक घटना घडली. शालेय परीक्षा नुकतीच संपवलेले दोन विद्यार्थी वडापाव खाण्यासाठी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर गेले होते. मात्र, गावी परत येताना झालेल्या अपघातात दोघांना जीव गमावला लागला.

ही घटना सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुक येथील आहे. वेदांत शरद शिंदे आणि प्रज्वल नितीन किर्दत हे दोघे बालपणापासूनचे मित्र होते. शालेय परीक्षा संपल्याच्या आनंदात सज्जनगड रस्त्यावर वडापाव खाण्यासाठी गेले होते. परत येताना त्यांनी एका दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतली.त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वेदांत व प्रज्वल दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण सज्जनगड परिसरात शोककळा पसरली आहे. दोघेही पहिलीपासून एकाच वर्गात शिकणारे मित्र होते. त्यांचा असा अचानक दुर्दैवी अंत झाल्याने गावातील नागरिकांचे अश्रू अनावर झाले होते. सातारा तालुका ठाण्याच्या पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.