बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण, ‘बाप्या’ची शारीरिक सक्षमता तपासणार, डीएनए चाचणीचीही तयारी.

बोपदेव घाटात मित्रासमवेत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना तीन ऑक्टोबरच्या रात्री घडली होती. पुण्यासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपी बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सूरज दशरथ गोसावी याला पुणे ग्रामीणच्या वालचंदनगर पोलिसांनी शनिवारी अकलूज परिसरातून ताब्यात घेतले.बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात साडेसहा महिन्यांनी जेरबंद झालेला आरोपी बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सूरज दशरथ गोसावीच्या शारीरिक सक्षमतेची तपासणी केली जाणार असून, ‘डीएनए’ चाचणीसाठी रक्त, नखे, केस आदी नमुने घेतले जाणार आहेत. आरोपी फरारी असताना कोणाकडे राहात होता, त्याला कोणी आश्रय दिला, याबाबतही चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी पुणे न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बोपदेव घाटात मित्रासमवेत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना तीन ऑक्टोबरच्या रात्री घडली होती. पुण्यासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपी बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सूरज दशरथ गोसावी (वय ३३, रा. दीपनगर, काटेवाडी, ता. बारामती) याला पुणे ग्रामीणच्या वालचंदनगर पोलिसांनी शनिवारी अकलूज परिसरातून ताब्यात घेतले. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शोएब अख्तर उर्फ शोएब बाबू शेख (वय २७, रा. आदर्शनगर, मंतरवाडी) आणि चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय २०, रा. होलेवस्ती, उंड्री) यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वीच अटक केली होती. मात्र, गोसावी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर साडेसहा महिन्यांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केली. गोसावी व त्याच्या साथीदारांनी बोपदेव घाट येथे मानवी जीवाला काळिमा फासणारे घृणास्पद कृत्य केले आहे.

आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यार, लुटलेले दागिने, गुन्हा करताना घातलेले कपडे जप्त करायचे आहेत. आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे; तसेच त्याने साथीदारांसोबत हा गुन्हा कसा केला, याबाबत चौकशी करायची आहे, असे तपास अधिकारी व सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.आरोपींवर ५०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७० (१), १२६ (२), ११५ (२), ३०९ (६), ३५२, ३५१ (२) (३) सह शस्त्र कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. शोएब शेख हा गुन्ह्यामागचा मुख्य सूत्रधार असून, आरोपींनी लूटमार व सामूहिक बलात्कार करण्याच्या हेतूने हा गुन्हा केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. आरोपींनी पीडितेची लुटलेली सोनसाखळी, तिला व तिच्या मित्राला धमकावण्यासाठी वापरलेला कोयता व काठी, आरोपींचे कपडे व दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.