आम्ही पाकिस्तानात जाणार नाही! नागपुरातील सिंधी लोकांच्या भावना, नागरिकत्व मिळण्यासाठी प्रयत्न सुरु

तलवारीच्या धाकावर आयुष्य किती दिवस काढायचे? अखेर निर्धार करून आम्ही भारतात आलो. मनाने आम्ही भारतीयच आहोत, आम्हाला पाकिस्तानात जायचे नाही’, अशी भावना नागपुरातील सिंधी बांधवांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.‘देशाची फाळणी आम्हाला नकोच होती. दुर्दैवाने फाळणी झाली आणि आम्ही एका क्षणात पाकिस्तानी झालो. वर्षानुवर्षे राहात असलेले घर सोडायचे नाही, असे ठरविले होते. मात्र, पाकिस्तानने आम्हाला आनंदाने जगूच दिले नाही. धर्मांतर करा अन्यथा देश सोडा, अशी धमकी वारंवार मिळत होती. तलवारीच्या धाकावर आयुष्य किती दिवस काढायचे? अखेर निर्धार करून आम्ही भारतात आलो. मनाने आम्ही भारतीयच आहोत, आम्हाला पाकिस्तानात जायचे नाही’, अशी भावना नागपुरातील सिंधी बांधवांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत सोडून जाण्याचे आदेश केंद्र सरकारने बुधवारी दिले. ही मुदत शुक्रवारी संपली. पोलिस प्रशासनाकडूनही पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्हालाही आता देश सोडावा लागतो का, अशी भीती सिंधी बांधवांमध्येही पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने त्यांच्याशी संवाद साधला.

‘आम्ही स्वत:ला कधीच पाकिस्तानी समजले नाही. पाकिस्तानात आमच्यावर सदैव तलवार लटकत होती. धर्मांतरणासाठी दबाव टाकला जात होता. ५० हिंदूंचे बळजबरीने धर्मांतरण करण्यात आले. महिनाभरात धर्म बदलवा अन्यथा पाकिस्तान सोडा, अशी धमकी देण्यात आली होती. आम्ही असुरक्षित आहोत, ही भावना सदैव मनात होती. अखेर आम्ही आमच्या मातृभूमीत परत आलो, अशी भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले.पुन्हा अखंड भारत व्हावा हीच इच्छा मनात ठेऊन सिंध मुक्त संघटन स्थापन करण्यात आले. गेल्या ५३ वर्षांपासून अखंड भारतासाठी लढा सुरू आहे. ४ एप्रिल १९७१ रोजी पहिला कार्यक्रम मोरभवन येथे घेण्यात आला होता, अशी आठवणही प्रा. विजय केवलरामानी यांनी सांगितली. राष्ट्रीय स्वसंयेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक, इतर पदाधिकारी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही कार्यक्रमांना भेट दिली. पाकिस्तानातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी सिंधू जलकरार रद्द करा, अशी मागणी दोन वर्षांपूर्वीच सिंध मुक्त संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती.

सिंधू जलकराराला स्थगिती देऊन भारताने पाकिस्तानचे नाक दाबले असल्याची भावनाही प्रा. केवलरामानी यांनी व्यक्त केली.फाळणी झाली तेव्हापासूनच सिंधी बांधवांचे भारतात येणे सुरू आहे. मिळेल तशी संधी साधून त्यांनी आपला देश गाठला. १९४९मध्ये नागपुरात येऊन नागरिकत्व मिळविणाऱ्या भारतीय सिंध मुक्त संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विजय केवलरामानी यांनी इतर सिंधी बांधवांसाठीही लढा दिला. १९६७ आणि १९७१मध्ये जरीपटका येथे विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. १९८०मध्ये ४५० सिंधी बांधवांना नागरिकत्व मिळवून दिले. जरीपटका येथे हा समुदाय मोठ्या प्रमाणात असून तिथे विकासकामेही करण्यात आली. गेल्या साडेसहा वर्षांत नागपुरातील ७५६ पाकिस्तानी नागरिकांना नागरिकत्व मिळाले. मात्र, अद्यापही ७२१ सिंधी बांधव नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) २०१९वर आमचा पूर्ण विश्वास असून त्यांनाही लवकरच न्याय मिळेल, असा विश्वास प्रा. विजय केवलरामानी यांनी व्यक्त केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.