लेडीज वॉशरुममध्ये लपून डोकवत होता, 23 वर्षीय तरुणी शिरली अन्… पुण्यात धक्कादायक प्रकार.

​​त्या वेळी प्रसाधनगृहातील दिवे बंद होते. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन आरोपी अनिल दुकाळे प्रसाधनगृहात लपून बसला होता. तरुणीने प्रसाधनगृहात गेल्यानंतर दिवे सुरू केलेविमाननगर परिसरातील एका खासगी कंपनीत महिलांच्या प्रसाधनगृहात लपून डोकावून पाहणाऱ्या सफाई कामगाराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार लक्षात येताच कर्मचारी तरुणीने आरडाओरडा केला. त्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांनी या सफाई कामगाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.अनिल दुकाळे (वय 25, रा. वडार वस्ती, मांजरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात एका तरुणीने विमाननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

तक्रारदार तरुणी (वय 23) विमाननगर परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करते. स्वच्छतेची कामे करणाऱ्या कंपनीमार्फत आरोपी दुकाळे या कंपनीत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून साफसफाईची कामे करतो. कंपनीचे कामकाज सुरू असताना तरुणी प्रसाधनगृहात गेली होती.त्या वेळी प्रसाधनगृहातील दिवे बंद होते. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन आरोपी अनिल दुकाळे प्रसाधनगृहात लपून बसला होता. तरुणीने प्रसाधनगृहात गेल्यानंतर दिवे सुरू केले. त्या वेळी प्रसाधनगृहात लपलेला दुकाळे चोरून डोकावत होता. ही बाब तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.दुकाळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा जामीनपात्र असल्याने त्याला नोटीस बजावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करीत आहेत.

दुसरीकडे, अवैध सावकराच्या छळाला कंटाळून युवकाने आत्महत्या केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सावकाराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. रोशन रमेश शेंडे (वय 35, रा. माळीपुरा, जुनी शुक्रवारी) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी सागर मधुकर कांबळे (वय 21, रा. तेलीपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोशन हा पेट्रोल पंपावर काम करीत होता. सागरचा दुधाचा व्यवसाय असून तो व्याजाने पैसे देतो. रोशनने सागर याच्याकडून दहा टक्के व्याजाने 11 हजार रुपये घेतले होते. तो सागरला व्याज द्यायचा. मात्र, सागर हा रोशनवर मूळ रक्कम परत करण्यासाठी दबाव टाकायचा आणि त्याचा छळ करायचा. ‘पैसे परत न केल्यास तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारेल’, अशी धमकी सागरने रोशनला दिली. त्यामुळे रोशन तणावात राहायला लागला. 19 एप्रिलला दुपारी रोशनने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान सागरच्या छळाला कंटाळून रोशनने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सागरविरुद्ध गुन्हा दाखल केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.