शुभमंगल ‘सावधान’! लग्नसोहळ्यातील जेवणातून विषबाधा; २८९ वऱ्हाडींची प्रकृती बिघडली, एका चिमुकल्याचा मृत्यू.

अंबाला गावासह कन्नड, खुलताबाद व चाळीसगाव तालुक्यांतील वऱ्हाडी व पाहुण्यांनी जेवण केले होते. शनिवारी दुपारी १२ वाजेपासून विषबाधेची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे विविध रुग्णालयांत रुग्णांना दाखल करण्यात आले.कन्नड तालुक्यातील अंबाला गावात आदिवासी ठाकर समाजाच्या आठ जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यातील जेवणातून विषबाधा झाल्याने एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. विवाह सोहळ्यातील २८९ विषबाधा झाली.सुरेश गुलाब मधे (वय आठ, रा. महादेवखोरा, कंरजखेडा, ता. कन्नड) असे विषबाधेमुळे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. संगीता मेंगाळ (वय २५, रा. अंबाला) या महिलेची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. विषबाधा झालेल्यांना रुग्णांना ग्रामीण रुग्णालय, करंजखेड, वडनेर व औराळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

३२ रुग्णांना छत्रपती संभाजीनगरला पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले, तर ९१ रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले.अंबाला येथे ठाकर आदिवासी समाजातील आठ जोडप्यांचा सामुहिक विवाह शुक्रवारी साडेचार वाजता पार पडला. विवाहानंतर जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. अंबाला गावासह कन्नड, खुलताबाद व चाळीसगाव तालुक्यांतील वऱ्हाडी व पाहुण्यांनी जेवण केले होते. शनिवारी दुपारी १२ वाजेपासून विषबाधेची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे विविध रुग्णालयांत रुग्णांना दाखल करण्यात आले.कन्नड ग्रामीण रुणालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार रुग्णावर लक्ष ठेवून होते.

वडनेर येथे डॉ. झगरे, करंजखेडा येथे डॉ. शेवगण व औराळा येथे डॉ. लोखंडे यांनी रुणावर उपचार केले. दरम्यान, रविवारी (२७ एप्रिल) छत्रपती संभाजीनगर आरोग्य उप संचालक डॉ. कांचन वानोरे, आरोग्य सह संचालक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी संबंधित प्राथमिक आरोग केंद्रांस भेट देऊन पाहणी केली.प्रेमभंग झालेल्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या प्रांगणातच चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी तरुणीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत ‘माझ्याने सहन होत नाही जानू आता; जातो मी सगळ्यांना सोडून’ अशी पोस्ट त्याने लिहिली होती. त्यामुळे प्रेमभंगातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.