“कुठेय तो..बोलवा त्याला..” भर बाजारात गोळीबार करत टोळक्याचा धुमाकूळ, चॉपरच्या हल्ल्यात एकाचा नाहक बळी.

गुरुवारी रात्री मानकापूर आठवडी बाजारात गर्दीच्या वेळी तीन आरोपींनी सोहेल खानवर धारदार चॉपरने वार केले. हत्या करताना बाजारात लोकांची मोठी गर्दी असताना आरोपींनी कोणतीही भीती न बाळगता गुन्हा केला. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी बेधडकपणे पळून गेले. यातील एकाने बाजारात हवेत गोळ्या झाडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भिती पसरली. लोकांनी जीव वाचवण्यासाठी इथून तिथे धावाधाव केली. शहरातील मानकापूरपोलीस ठाण्याच्या हद्दीत झिंगाबाई टाकळी परिसरात गुरुवारी रात्री घडलेली हत्या परिसरात मोठी खळबळ उडवणारी ठरली. रात्री सुमारे ९ वाजता, मानकापूर आठवडी बाजारात लोकांनी गर्दी केलेल्या ठिकाणी काही गुन्हेगारांनी थेट गोळीबार करत एका युवकाची निर्घृण हत्या केली. मृतक युवकाचे नाव सोहेल खान (वय ३५) असे असून, तो प्रकाश नगर परिसरातील रहिवासी होता. पाच जणांच्या टोळीने बाजारात शस्त्रांसह प्रवेश केला आणि “शाहरुख कुठे आहे?” असे विचारत अचानक गोळीबार सुरू केला.

यावेळी काही आरोपींनी चॉपरने वार करत सोहेल खानवर हल्ला केला. या हल्ल्यात सोहेलचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.गुरुवारी रात्री आठवडी बाजारात गर्दीच्या वेळी तीन आरोपींनी सोहेल खानवर धारदार चॉपरने वार केले. हत्या करताना बाजारात लोकांची मोठी गर्दी असताना आरोपींनी कोणतीही भीती न बाळगता गुन्हा केला. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी बेधडकपणे पळून गेले. यातील एकाने बाजारात हवेत गोळ्या झाडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भिती पसरली. लोकांनी जीव वाचवण्यासाठी इथून तिथे धावाधाव केली. बाजारात अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत धीरज घोडमारे, राजेंद्र मरकाम आणि भूषण या तीन आरोपींना अटक केली असून चौथा आरोपी चंदू डोंगरे अद्याप फरार आहे.

त्याचा शोध सध्या सुरू आहे.या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, काही युवकांनी घोषणाबाजी करत दुचाकींवर तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मेयो रुग्णालयासमोरही जमाव जमा झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. भाजीच्या ठेल्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. काहिच दिवसांपूर्वी नागपुरात हिंसाचार उसळला होता. त्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली होती. मुख्यमंत्र्यांचे शहर आणि राज्याची उपराजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपुरात गुंडांना कायद्याचे भय राहिले आहे की नाहि? असा संतप्त सवाल या हत्याकांडानंतर नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

  • Related Posts

    ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अजित डोवाल सक्रिय, भारताच्या धडक कारवाईनंतर केले महत्वाचे काम.

    भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप लोकांच्या नरसंहाराचा बदला आज घेण्यात आला. या यशस्वी ऑपरेशननंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अनेक देशांतील समकक्ष…

    १२वीचा निकाल लागला, आनंदात प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला; नातेवाईकांकडून तरुणाचा खून.

    मुलीचा नातेवाईक योगेश यशवंत दूटे याच्याविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नवनाथ तुकाराम…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अजित डोवाल सक्रिय, भारताच्या धडक कारवाईनंतर केले महत्वाचे काम.

    ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अजित डोवाल सक्रिय, भारताच्या धडक कारवाईनंतर केले महत्वाचे काम.

    १२वीचा निकाल लागला, आनंदात प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला; नातेवाईकांकडून तरुणाचा खून.

    १२वीचा निकाल लागला, आनंदात प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला; नातेवाईकांकडून तरुणाचा खून.

    आणखी मोठं काहीतरी घडण्याचे संकेत, जवानांच्या सुट्ट्या रद्द, विमानतळांवरची उड्डाणे बंद.

    आणखी मोठं काहीतरी घडण्याचे संकेत, जवानांच्या सुट्ट्या रद्द, विमानतळांवरची उड्डाणे बंद.

    प्रेरणा फाऊंडेशन व सत्कर्म बालकाश्रम राष्ट्रगौरव पुरस्काराने गोसेवक प्राणीमित्र रोहित महाले सन्मानित.

    प्रेरणा फाऊंडेशन व सत्कर्म बालकाश्रम राष्ट्रगौरव पुरस्काराने गोसेवक प्राणीमित्र रोहित महाले सन्मानित.