वसुली भाईंची दादागिरी! कर्जाचा केवळ एक हप्ता थकला, कर्जदाराला घरात घुसून मारहाण, तिघांवर गुन्हा.

 तक्रारदाराने मुलीच्या शिक्षणासाठी सात लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज शिवाजीनगर परिसरातील एका खासगी वित्तीय संस्थेकडून घेतले होते.तक्रारदाराने पोलिस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा मारहाण करणाऱ्या वसुली एजंटने खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापक हर्षद जिमन याच्या सांगण्यावरून आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. मारहाण केल्याप्रकरणी दोघांनी अटक करण्यात आली, अशी माहिती वानवडी पोलिसांनी दिली.खासगी वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने वसुली एजंटने कर्जदाराच्या घरात घुसून मारहाण केल्याची घटना वानवडी येथे घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, वित्तीय संस्थेच्या व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल केला.आकाश पुरुषोत्तम सापा (वय ३२, रा. भवानी पेठ), हृषीकेश नागनाथ चंदनशिवे (वय २६, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हर्षद जिमन असे गुन्हा दाखल केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वानवडीतील शांतिनगर येथे राहतात. तक्रारदार स्वत: बँकेतील कर्ज प्रकरणे मार्गी लावण्यासाठी मध्यस्थी करतात. त्यासाठी त्यांना कर्जदार, तसेच बँकेकडून काही मोबदलाही मिळतो. तक्रारदाराने मुलीच्या शिक्षणासाठी सात लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज शिवाजीनगर परिसरातील एका खासगी वित्तीय संस्थेकडून घेतले होते. कर्ज मंजूर झाल्यानंतर रकमेतून विम्यापोटी ४३ हजारांची रक्कम कापून घेण्यात आली. कर्ज मंजुरी प्रक्रिया शुल्क कापून घेण्यात आले. त्यांच्या खात्यात सहा लाख ८५ हजार रुपये जमा झाले. दरमहा १८ हजार ७० रुपये हप्ता होता. तक्रारदाराने नियमतपणे २४ हप्ते भरले. दरम्यान, त्यांच्या भाच्याचा अपघात झाला. त्या वेळी तक्रारदाराने उपचारासाठी बहिणीला काही आर्थिक मदत केली. त्यामुळे त्यांचा एक महिन्याचा हप्ता थकला. दोन मार्चला त्यांनी हप्ता भरला नाही. त्यानंतर २५ मार्चला त्यांच्या मोबाइल क्रमांकावर खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला.हप्ता थकल्याने त्यांना शिवीगाळ करून धमकावले.

त्यानंतर तक्रारदार २६ मार्चला वित्तीय संस्थेच्या वाकडेवाडी येथील कार्यालयात गेले. हप्ता का थकला, याबाबतचे कारणही त्यांनी दिले. गुरुवारी (२७ मार्च) सायंकाळी तक्रारदार आणि त्यांचा भाऊ घरात होता. त्या वेळी दोघे जण त्यांच्या घरी आले. आम्ही खासगी वित्तीय संस्थेतून आल्याचे त्यांनी सांगितले. त्या वेळी तक्रारदाराने त्यांना ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. दोघांनी त्यांना शिवीगाळ केली. थकलेल्या हप्त्याची रक्कम घेतल्याशिवाय जाणार नाही, असे सांगून दोघांनी तक्रारदार आणि त्यांच्या भावाला मारहाण केली.तक्रारदाराने पोलिस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा मारहाण करणाऱ्या वसुली एजंटने खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापक हर्षद जिमन याच्या सांगण्यावरून आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. मारहाण केल्याप्रकरणी दोघांनी अटक करण्यात आली, अशी माहिती वानवडी पोलिसांनी दिली

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.