अलिबागही आता ‘टप्प्यात’, मुंबई महानगर प्राधिकरणाचा विस्तार, किती कोटींची तरतूद.

 मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरील ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कुळगाव-बदलापूर नगर परिषद क्षेत्रासह अलिबाग तालुक्यातील विकासकामांवर भर देण्याचे सूतोवाच शुक्रवारी अर्थसंकल्पाद्वारे केले.मुंबईतील ६ हजार चौरस किमीहून अधिक क्षेत्रफळावर विकासकामे करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने  अलिबागपर्यंत विस्तार केला आहे. मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरील ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कुळगाव-बदलापूर नगर परिषद क्षेत्रासह अलिबाग तालुक्यातील विकासकामांवर भर देण्याचे सूतोवाच शुक्रवारी अर्थसंकल्पाद्वारे केले.‘एमएमआरडीए’ची अर्थसंकल्पीय बैठक शुक्रवारी झाली. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात सरत्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १४.३५ टक्क्यांची घट करण्यात आली आहे. प्राधिकरणाने एकूण खर्चातील पायाभूत विकास प्रकल्पांवरील तरतुदीतही जवळपास अडीच टक्क्यांची कपात केली आहे. यानुसार ३२४८ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प प्राधिकरणाने अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सादर केला.२०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण ४० हजार १८७ कोटी रुपये खर्चाचा करण्यात आला. हाच आकडा गेल्या वर्षी (२०२४-२५ साठी) ४६ हजार ९२१.२९ कोटी रुपये इतका होता.

गेल्या वर्षी एकूण खर्चाच्या ८९.१४ टक्के तरतूद पायाभूत विकास प्रकल्पांसाठी होती. येत्या आर्थिक वर्षात ही टक्केवारी ८७.४७ वर आली आहे. यानुसार प्राधिकरणाने एकूण खर्चापैकी ३५ हजार १५१.१४ कोटी रुपये १४ पायाभूत सुविधांवर खर्च करण्याचे निश्चित केले आहे.२०२५-२६ हे प्राधिकरणाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याबाबत चर्चा झाली. त्यामध्ये मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, नवीन बोगदेमार्ग, सागरी मार्ग, जलस्रोत विकास आणि नागरी पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरील ठाणे महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, कुळगाव-बदलापूर नगर परिषद व अलिबाग तालुक्यातील कामे करण्याचे अर्थसंकल्पात ठरविण्यात आले आहे.

वसई-विरार, मीरा-भाईंदर, दहिसर ते ठाणे यांना जोडणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गायमुख ते फाऊंटन हॉटेल व फाऊंटन हॉटेल ते भाईंदरपर्यंत उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. वारंवार आरेखन बदल होणाऱ्या या गुंतागुंतीच्या प्रकल्पाला अद्याप पूर्ण रुपात वनविभागाची परवानगीही मिळालेली नाही. या प्रकल्पांचा खर्च जवळपास २० हजार कोटी रुपये आहे. त्यासाठी २२०० कोटी रुपये म्हणजेच १० टक्क्यांहून थोडी अधिक तरतूद करण्यात आली आहे. याच मार्गावरुन मेट्रो १० देखील प्रस्तावित आहे. मात्र, त्यासाठी यंदा निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.