‘ते’ सावित्रीबाईंपेक्षा मोठे नाहीत; छगन भुजबळांचा पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या नामकरणाला विरोध.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना भुजबळ यांनी मंत्रिमंडळ विस्तारातून डावलण्यासह राज्यसरकारच्या समित्यांमधूनही डावलण्यात आल्याबाबत भाष्य केले.स्वांतत्र्यवीर सावरकर, भाऊसाहेब हिरे हे सावित्रीबाई फुलेंपेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राला देण्यास आपला विरोध असल्याचे सांगत, भुजबळांनी नामकरणाच्या वादावर नाराजी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, तसेच शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रांना त्यांचीच नावे असताना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्राला अन्य नावे का, असा सवाल करीत, तुमच्या संस्थांना ही नावे द्या, असा सल्लाही भुजबळांनी दिला.नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना भुजबळ यांनी मंत्रिमंडळ विस्तारातून डावलण्यासह राज्यसरकारच्या समित्यांमधूनही डावलण्यात आल्याबाबत भाष्य केले.

मंत्रिमंडळ विस्ताराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा, असे सांगत, या समित्या कनिष्ठ लोकांसाठी आहेत. ओबीसी म्हणून सुहास कांदेंना संधी मिळाली आहे. त्यामुळे माझ्या नाराजीचा प्रश्न निरर्थक असल्याचे भुजबळ म्हणाले. मी उपमुख्यमंत्री राहिलो असून, वरिष्ठ आमदार आहे. त्यामुळे मला आणखी किती खाली आणायचे, असा सवालही त्यांनी केला.या समित्यांवर नवीन आमदारांना संधी दिली. केवळ लोकलेखा समितीवर विरोधी पक्षाच्या वरिष्ठ आमदाराची नियुक्ती करण्याची प्रथा असल्याचे ते म्हणाले. सिंहस्थापूर्वी साधू-महंतांच्या स्नानासाठी गोदावरीचे पाणी शुद्ध होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा यात भांडण करण्यासारखे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर झालेल्या हल्ल्याबाबतही भुजबळांनी भाष्य केले. वकील हा शेवटी माणूसच असतो. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रत्येकाच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे राग येणे स्वाभाविक आहे. महाराजांबाबत ज्या प्रकारे अवमान झाला, त्यामुळे व्यथित होऊन वकिलाने हात उचलला असेल, असे असे ते म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.