भयंकर! ४ वर्षांच्या आयतचा शवविच्छेदन अहवाल समोर, आई-वडिलांनी हाल हाल करुन मारलं.

आयतच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार जबर मारहाणीत आयत चा मृत्यू झाला होता. आयतच्या डोक्यावर, गळ्यावर जखमा आढळून आल्या तसेच डावा हात, गुडघा, बरगड्या फ्रॅक्चर आहेत.दत्तक घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीच्या खून प्रकरणात शवविच्छेदन अहवाल समोराला आहे. यात आयतच्या डोक्यावर,गळ्यावर जखमा आढळून आल्या तसेच डावा हात, गुडघा, बरगड्या फ्रॅक्चर आहेत. एवढेच नाही तर चेहरा व गुप्तांगावर देखील जखमा आढळून आल्या आहेत. अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. आयत फईम शेख वय ४ वर्ष असे निर्दयीपणे खून केलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर फौजिया शेख फईम वय २७, शेख फईम शेख अयुब वय ३५ रा. अजिंठा हली मुक्काम मुगलपुरा सिल्लोड अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जालना येथील नाझियाचे पंधरा वर्षांपूर्वी शेख नसीम अब्दुल कयूम वय ३५ वर्ष याच्या सोबत झाला होता.

विवाहानंतर या दाम्पत्याला ५ मुली झाल्या. यानंतर पती दारूच्या आहारी गेला होता नाझियाला तो नीट वागवत नव्हता. यामुळे नाझिया व नसीम यांच्यात जून २०२४ मध्ये घटस्फोट झाला. पाच पैकी चार मुली नाझियाकडे होत्या तर एक आयत ही वडील शेख नसीमकडे होती.शेख नसीम याला दारूची सवय होती तो चिमुकल्या आयतला अक्षरशः भीक मागायला लावायचा. यातून ६ महिन्यांपूर्वी आयतला पाच हजार रुपयांमध्ये विकले. या व्यवहाराचा चक्क १०० रुपयाच्या बॉण्ड पेपरवर करार देखील केला.

दत्तक घेतल्यानंतर फौजिया शेख ,फईम शेख यांनी आयतचा निर्दयीपणे छळ करून खून केला. परस्पर दफन विधी करतानाही धक्कादायक बाब उघडकीस आली. याप्रकरणी निर्दयी पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.या खून प्रकरणात आता शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार जबर मारहाणीत आयत चा मृत्यू झाला होता. आयतच्या डोक्यावर, गळ्यावर जखमा आढळून आल्या तसेच डावा हात, गुडघा, बरगड्या फ्रॅक्चर आहेत. एवढेच नाही तर चेहरा व गुप्तांगावर देखील जखमा आढळून आल्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.