अजबच! बाईक टोइंग करताना मालकालाही धोकादायकरीत्या उचललं; पुण्यातील घटना, कर्मचाऱ्यांची अरेरावी.

‘जागेवर दंड भरतो, गाडी उचलू नका’ अशी विनवणी करीत गाडी उचलण्यास अटकाव करणाऱ्या दुचाकीस्वाराचा हात क्रेनच्या पट्ट्यात अडकल्याने दुचाकीस्वार गाडीसोबत धोकादायकरीत्या उचलला गेला.नो-पार्किंगमधील दुचाकी क्रेनद्वारे उचलून वर ठेवताना दुचाकीस्वारालाही तीन ते चार फुटांपर्यंत उचलल्याचा धक्कादायक प्रकार गुलटेकडी परिसरात (डायस प्लॉटजवळ) घडला. ‘जागेवर दंड भरतो, गाडी उचलू नका’ अशी विनवणी करीत गाडी उचलण्यास अटकाव करणाऱ्या दुचाकीस्वाराचा हात क्रेनच्या पट्ट्यात अडकल्याने दुचाकीस्वार गाडीसोबत धोकादायकरीत्या उचलला गेला. यात दुचाकीस्वाराच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. मात्र, मोठा अपघात होता होता टळला. दुचाकी चालकाने ही घटना समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली आहे.शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास गुलटेकडी परिसरात ही घटना घडली. संबंधित दुचाकीस्वाराने गुलटेकडी येथे पदपथावर दुचाकी पार्क केली होती. तेवढ्यात वाहतूक पोलिसांची क्रेन तेथे आली. पोलिस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून क्रेनवरील कर्मचाऱ्यांनी गाडी क्रेनपर्यंत ढकलत नेली. दुचाकीस्वाराला स्वत:ची चूक मान्य होती.

त्यामुळे ते जागेवर दंड भरण्यास तयार होते. मात्र, क्रेनवरील कर्मचाऱ्याने दुचाकीस्वाराचे काहीही न ऐकता दुचाकी उचलण्यास सुरुवात केली. दुचाकीस्वाराने त्यास विरोध केला असता, टोइंग करणारे कर्मचारी मनमानीपणे गाड्या उचलत होते.टोइंग कर्मचाऱ्याने दुचाकीस्वाराच्या गाडीला पट्टी अडकवली आणि क्रेन ऑपरेटरला गाडी वर घेण्यास सांगितले. त्या वेळी दुचाकीस्वाराचा हात दुचाकीचा हँडल आणि पट्टी यामध्ये अडकला. दुचाकीस्वाराने त्याबाबत क्रेनवरील कर्मचाऱ्यास सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीस्वाराकडे लक्ष न देता त्यांनी गाडी उचलली. यामुळे दुचाकीस्वार सुमारे तीन ते साडेतीन फुटांपर्यंत वर उचलला गेला.

दुचाकीस्वाराने आरडाओरडा केल्यानंतर क्रेनचालकाने त्यांना खाली उतरवले. यामध्ये दुचाकीस्वाराच्या हाताला इजा झाली.यानंतर दुचाकीस्वाराने पोलिस हवालदाराकडे विचारणा केली असता, संबंधिताने दुचाकीस्वारालाच दोषी ठरवले. त्यातच टोइंग करणारे कर्मचारीही उद्धटपणे वागू लागले. मात्र, हा प्रकार पाहून जमलेल्या नागरिकांनी या अन्यायकारक कारवाईवर आवाज उठवला, वाढती गर्दी पाहून पोलिसांनी आणि टोइंग कर्मचाऱ्यांनी घाईघाईने गाडी परत पदपथावर ठेवली आणि तेथून काढता पाय घेतला.नागरिकाने जागेवर दंड भरण्याची तयारी दाखवूनही त्याच्या गाडीला उचलण्याची गरज होती का?वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणार का?पोलिसांच्या देखरेखीखाली काम करणारे टोइंग कर्मचारी इतक्या उद्धटपणे का वागतात? अशा प्रकारामुळे एखाद्याच्या जीवाला धोका झाला असता तर जबाबदार कोण? यापूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात एका दुचाकीस्वाराला दुचाकीसोबत उचलून क्रेनमध्ये ठेवले होते

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.