जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच दिवशी 34,423 घरकुलांचे भूमिपूजन.

जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच दिवशी 34,423 घरकुलांचे भूमिपूजन. जळगाव प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 34,423 घरकुलांचे भूमिपूजन 27 मार्च 2025 रोजी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. जळगाव जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये सन 2024-25 या वर्षात एकूण 86,689 घरकुल मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 71,645 लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला. या अनुषंगाने 4 मार्च 2025 रोजी विशेष मोहीम राबवून 35,264 घरकुलांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली होती.

आजच्या विशेष अभियानाअंतर्गत 34,423 घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे आतापर्यंत एकूण 70,687 घरकुलांचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंते आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कामाच्या सातत्यपूर्ण अनुषंगाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी तालुकास्तरावर भेटी देऊन लाभार्थ्यांना प्रेरित केले.

तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व गटविकास अधिकाऱ्यांना नियमित पाठपुरावा करून काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सुरू असलेला हा वेग गृहनिर्माण क्षेत्रात जळगाव जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.