मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तब्बल २५५५ कोटी, कृषिमंत्र्यांची घोषणा.

​​या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. राज्यातील जवळपास ६४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट २,५५५ कोटींची विमा नुकसानभरपाई जमा होणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २,८५२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी दिली.या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कोकाटे यांनी म्हणाले.विमा नुकसान भरपाईअंतर्गत खरीप आणि रब्बी २०२२-२३ या हंगामांसाठी २.८७ कोटी, खरीप २०२३ साठी १८१ कोटी, रब्बी हंगाम २०२३-२४ साठी ६३.१४ कोटी आणि खरीप हंगाम २०२४ साठी २,३०८ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे.

एकूण २,५५५ कोटींचा लाभ चार लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून, नुकसानभरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही कोकाटे यांनी सांगितले.आदिवासी समाजाचे जीवनमान उंचवण्यासाठी राज्य सरकारकडून आदर्श आदिवासी गाव योजना राबविण्यात येणार आहे. १३ जिल्ह्यांतील ५९ तालुक्यातील प्रतितालुका किमान एक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्व गावे व पाडे यांची या योजनेसाठी निवड करण्यात येईल.

गावांचा विकास करण्यासाठी पुढील दोन वर्षांपर्यंतचे नियोजन करण्यात येणार आहे.सततच्या नापिकीमुळे कर्जाचा भार वाढल्याने महागाव तालुक्यातील घोणसरा येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सखाराम सुभाष झोलांडे (३३) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. सखाराम यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. यातून उदरभरण करीत असतानाच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा बँकेचे कर्ज थकले. उसनवारीही वाढली. हे सर्व कर्ज परतफेड करण्याची चिंता त्यांना सतावत असताना गुरुवारी दुपारी शेतातील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.