नदीवर उभारला बेकायदा पूल; बिहारमध्ये रिअल इस्टेट दलालांचे कृत्य, नेमकं प्रकरण काय.

बिहारमधील रिअल इस्टेट दलालांनी जमिनींच्या भाववाढीसाठी लगतच्या नदीवर चक्क बेकायदा पूल उभारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून अनेक नवनवीन शक्कल लढवल्या जातात. मात्र, बिहारमधील रिअल इस्टेट दलालांनी जमिनींच्या भाववाढीसाठी लगतच्या नदीवर चक्क बेकायदा पूल उभारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.पूर्णिया जिल्ह्यातील या खळबळजनक घटनेची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना दिली. ‘पूर्णिया शहरातून वाहणाऱ्या कारी कोसी नदीलगत असलेल्या रहमत नगर भागातील प्रभाग क्रमांक ४मधील काही जमिनींमध्ये रिअल इस्टेट दलालांचा हिस्सा आहे. या जमिनींच्या भाववाढीसाठी या दलालांनी महानगरपालिकेची परवानगी न घेताच कारी कोसी नदीवर ६० फूट लांब आणि १० फूट रूंद पूल उभारला.

हा पूल तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत’, असे पूर्णियाचे महापालिका आयुक्त कुमार मंगलम यांनी सांगितले. हे क्षेत्र पूर्णिया महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रात असून, जलसंपदा विभागाकडून स्पष्टीकरण मागितले असल्याचेही मंगलम यांनी सांगितले.‘महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या एका पथकाने पुढील कारवाई करण्याच्या दृष्टीने गुरुवारी घटनास्थळी जाऊन पुलाची पाहणी केली. मात्र, पूल उभारण्यात हितसंबंध असलेल्या लोकांनी स्थानिकांना चिथावले.

त्यांनी आक्षेप घेत महापालिका अधिकाऱ्यांना पुढील कारवाई करण्यापासून रोखले. परंतु, आम्ही निश्चितपणे विद्यमान कायद्यानुसार कारवाई करू’, असे मंगलम म्हणाले.या पुलाच्या बांधकामामागे जमीन माफिया आणि दलालांच्या संभाव्य सहभागाची शक्यता महापालिका अधिकाऱ्यांनी नाकारली नाही. स्थानिक लोक या दलालांची ओळख उघड करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पुलाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, हा पूल सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.