वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं, भरधाव गाडीची दोन युवतींना धडक अन् कार थेट घरात घुसली.

नागपूरच्या अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अपघातात भरधाव कार थेट घरात शिरल्याने चौघे जखमी झाले, यामध्ये दोन युवतींचा समावेश आहे. याचबरोबर नाशिकमध्ये तिहेरी अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाला. या घटनांचा पोलिस तपास सुरू आहे.अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका अपघातात एक भरधाव कार थेट घरात शिरल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना एका उद्यानाच्या वळणावर घडली. यावेळी परिसरात वॉकिंग करणाऱ्या दोन युवतींशिवाय चालक आणि त्याचा साथीदार असे चौघे जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास  उघडकीस आली.गौरी सावरकर, कीर्ती गोले अशी जखमी तरुणींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी अंबाझरी उद्यानाच्या वळणावरून एमएच ४९-एस-१८०० क्रमांकाची कार भरधाव वेगाने आली.

ती थेट रस्त्याच्या खाली उतरली.यावेळी तेथून वॉकिंग करीत असलेल्या गौरी सावरकर, कीर्ती गोले यांना धडकत देत, जखमी केले आणि बाजूला असलेल्या कुमरे यांच्या घराच्या वॉल कम्पाऊंडला कार धडकली. कारची गती इतकी होती की, धडकेत वॉल कम्पाऊंड पूर्णतः पडले. यावेळी चालकासह त्याचा साथीदारही जखमी झालेत.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, ते घटनास्थळी दाखल झाले. त्यापूर्वी चारही जखमी हे खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. सध्या चौघांवरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कार चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे.दुसरीकडे, नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नरच्या गुरेवाडी शिवारातील मातोश्री हॉटेलजवळ झालेल्या दोन कार आणि एक दुचाकी अशा तिहेरी वाहनांच्या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुण ठार झाला.

गुरुवारी (दि.२७) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचे अक्षरशः दोन तुकडे झाले. अपघातात साहिल दिलीप गुडघे (वय २३) या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.सोनेवाडी (ता. कोपरगाव) येथील साहिल दिलीप गुडघे आपल्या दुचाकीने संगमनेर बाजूकडून सिन्नरकडे येत होता. त्याचवेळी त्याच्या पुढे जाणारी टियागो कार आणि समोरून येणारी स्विफ्ट कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात साहिलच्या डोक्यावरील हेल्मेट उडून बाजूला पडले, तर त्याच्या ताब्यातील पल्सर दुचाकीचे दोन तुकडे झाले. दोन्ही कारचेही काही प्रमाणात नुकसान झाले. अपघातात दुचाकीवरील साहिल गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या साहिलची शुक्रवारी (दि.२८) नाशिक येथे परीक्षा होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.