१० तासांचा थरार आणि मुंबईतून अटक, १०८ गंभीर गुन्हे असणारे अट्टल गुन्हेगार अखेर जेरबंद.

मुकुंदवाडी परिसरातील विमानतळाच्या संरक्षण भिंतीच्या शेजारी इच्छामणी हॉटेल आहे. या परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या सुनील रामभाऊ डुकळे याचा अड्डा आहे. त्याच ठिकाणी तो पत्त्याचा क्लब देखील चालवतो. दरम्यान याच ठिकाणी यातील एका आरोपीला जुगार अड्डा सुरू करायचा होता. यातील एका टोळीने डुकळे याच्यासह त्याचा मुलगा व भाच्यावर सशस्त्र हल्ला केला.अवैध धंद्यातील वादावरून मुकुंदवाडी मध्ये दोन गटात गॅंगवर उफाळाला. यात हेल्मेट, मुक्या अन् बालाजी हे मुख्य आरोपी आहेत. यात हेल्मेट, बालाजीवर प्रत्येकी ४६ गुन्हे तर मुक्यावर १६. असे तीनही आरोपींवर तब्बल १०८ गुन्हे दाखल आहे. या तिघांना छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने १० तासांचा सापळा रचून मुंबईतून अटक केली आहे.

मुकुंदवाडी परिसरातील विमानतळाच्या संरक्षण भिंतीच्या शेजारी इच्छामणी हॉटेल आहे. या परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या सुनील रामभाऊ डुकळे याचा अड्डा आहे. त्याच ठिकाणी तो पत्त्याचा क्लब देखील चालवतो. दरम्यान याच ठिकाणी यातील एका आरोपीला जुगार अड्डा सुरू करायचा होता. यातील एका टोळीने डुकळे याच्यासह त्याचा मुलगा व भाच्यावर सशस्त्र हल्ला केला. जुगार अड्डा चालवायचा असेल तर हेल्मेटला महिन्याला दोन हजार रुपये खंडणी द्यावी लागेल असे धमकावले. मारहाणीनंतर टोळीने दहा हजार रुपये घेऊन पळ काढला. त्यानंतर हॅम्लेट व मुक्या यांनी धारदार शस्त्रासह व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर टाकले. या कुख्यात गुन्हेगारांचा गुन्हे शाखा शोध घेत होती.

धारदार शस्त्रांसह खंडणी मागणाऱ्या हेल्मेट, बालाजी, मुक्या यांच्या बद्दल परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. रोहित मस्के, अजय उर्फ अज्या-भज्या आदमाने, सुंदर उर्फ सुंदऱ्या कांबळे, संकेत लांबदांडे अशी नऊ जणांची टोळी असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कुख्यात आरोपींना पकडणं याचं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालं. यातील तीन आरोपींवर तब्बल १०८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. हेल्मेट,बालाजीवर प्रत्येकी ४६ गुन्हे तर मुक्यावर १६ असे ३ आरोपींवर तब्बल १०८ गुन्हे दाखल आहे. आतापर्यंत या प्रकरणात ५ आरोपी अटक आहेत. मात्र यात ३ आरोपी आणखी वाढले आहेत. ज्यात रोहित मस्के, अजय उर्फ अज्या-भज्या आदमाने, सुंदर उर्फ सुंदऱ्या कांबळे,संकेत लांबदांडे अशी नऊ जणांची टोळी आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.