प्रशांत कोरटकर याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात आज परत हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकिलांनी कोरटकरच्या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्याला कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी विरोध केला. यावेळी वकील असीम सरोदे आणि वकील सौरभ घाग यांच्यात शाब्दिक वाद झाला. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा तथा महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याला कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं. कोरटकरला मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज न्यायालयात हजर करण्यात आलं. कोरटकरची आज पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात आज परत हजर करण्यात आलं. चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर S.S. तट यांच्या समोर सुनावणी पार पडली. सरकारी पक्षातर्फे वकील सूर्यकांत पोवार हे सुनावणीत प्रत्यक्ष सहभागी झाले. इंद्रजित सावंत यांच्या तर्फे वकील असीम सरोदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिकद्वारे ऑनलाईन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले. तर प्रशांत कोरटकर याच्या तर्फे वकील सौरभ घाग हेही सुनावणीत प्रत्यक्ष सहभागी झाले. यावेळी सावंत यांचे वकील असीम सरोदे आणि कोरटकरचे वकील सौरभ घाग यांच्या खडाजंगी झाली.

तपास अधिकारी PSI संतोष गळवे यांनी न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली. “आरोपी ज्या ज्या हॉटेलमध्ये राहिला होता त्या माहितीवरून हॉटेल व्यवस्थापकांना नोटीस देऊन माहिती घ्यायची आहे. तपासात काही जणांची नावे पुढे आली आहेत. त्यांना नोटीस पाठवली आहे. कोरटकरने वापरलेली एक गाडी जप्त केली आहे. कोणी कोणी मदत केली त्यांच्यासोबत समोरासमोर बसवून तपास करायचा आहे. गुन्ह्यात कोणते वाहन वापरले होते याची अजून चौकशी करायची आहे. आरोपीने फोन केला होता. त्यावेळी समान उद्दीष्टे ठेऊन त्यांच्यासोबत कोण होते याचा तपास करायचा आहे. अंतरिम संरक्षण नसताना आर्थिक मदत कोणी केली याचा तपास करायचा आहे. त्यासाठी वाढीव कोठडी हवी आहे”, असं तपास अधिकारी म्हणाले.”प्रशीक पडवेकर, राजेंद्र जोशी, आणखी दोघे यांना नोटीस पाठवली आहे. या लोकांनी मदत केली तर त्यांना या गुन्हात आरोपी करता येईल. धीरज चौधरी याची कार फरार होण्यासाठी वापरल्याची आरोपीने माहीती दिलीय. ती कार गुन्ह्यात जप्त केली आहे. ज्या लोकांची नावे घेतली आहेत ती हयात आहेत का? तपासायची आहे. त्यांना समोरा समोर बसवून तपास करायचा आहे. यूपीआय पेमेंट फरार काळात केलेलं नाही.











