देशमुख हत्या प्रकरणात नवी थिअरी समोर; चाटे, केदारचा वेगळाच जबाब; सुग्रीव कराडचं नाव घेतलं.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक नवी थिअरी समोर आली आहे. आवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणीच्या आड आल्यानं संतोष देशमुखांची अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचं तपास यंत्रणांच्या तपासातून स्पष्ट झालं आहे.बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक नवी थिअरी समोर आली आहे. आवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणीच्या आड आल्यानं संतोष देशमुखांची अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचं तपास यंत्रणांच्या तपासातून स्पष्ट झालं आहे. पण या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या जबाबामध्ये वेगळाच दावा केला आहे. त्यांनी जबाबामध्ये सुग्रीव कराडचं नाव घेतलं आहे. त्यामुळे सुग्रीव कराड नेमका कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडदेखील अटकेत आहे. हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांचा जबाब समोर आला आहे. त्यातून सुग्रीव कराडचं नावही समोर आलं आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुन सरपंच संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली होती. त्याचा बदला म्हणून घुले आणि त्याच्या साथीदारांनी देशमुख यांना मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला, असं जयराम चाटे आणि महेश केदारनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. विशेष म्हणजे चाटे आणि केदार यांच्या जबाबात खंडणीचा उल्लेख कुठेही नाही.’आवादा कंपनीच्या आवारात सुदर्शन घुलेला मारहाण झाली होती. सरपंच देशमुख आणि ग्रामस्थांनी सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुन घुलेला मारहाण केली. या प्रकारामुळे घुले आणि वाल्मिक अण्णा कराडचा अपमान झाल्याचं फरार आरोपी कृष्णा आंधळेनं आम्हाला सांगितलं. घुले आणि वाल्मिक अण्णाच्या अपमानाचा बदला घ्यावा लागेल, असं आंधळे आम्हाला म्हणाला होता,’ असं चाटे आणि केदारनं जबाबात म्हटलं आहे.घुलेला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, असा दावा चाटे आणि केदारनं केला आहे. त्यांच्या जबाबामुळे या प्रकरणात सुग्रीम कराड नावाची एन्ट्री झालेली आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुन सरपंच देशमुख आणि ग्रामस्थांनी घुलेला मारहाण केली, असं चाटे आणि केदारनं सांगितलं आहे. त्यामुळे सुग्रीव कराड नेमका कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.