म्यानमार, थायलंड, बांग्लादेशात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल इतकी आहे. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमधून एक व्हिडीओ समोर आला आहे.बँकॉक: म्यानमार, थायलंड, बांग्लादेशात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल इतकी आहे. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात एक बहुमजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळताना दिसत आहे. भूकंपाचे धक्के दिल्ली एनसीआरपर्यंत जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत केवळ १० किलोमीटर खोलवर असल्यानं नुकसानाची तीव्रता वाढली. बँकॉकमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.











